१५ ऑगस्ट २०२७ रोजी धावेल पहिली बुलेट ट्रेन! रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

आदित्य कदम
1 Min Read

भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावेल, अशी मोठी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या दिवशी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सूरत ते बिलिमोरा (गुजरात) दरम्यान बुलेट ट्रेन सेवा उपलब्ध होईल. याच वर्षी निधी नियोजनात या प्रकल्पासाठी लक्षणीय तरतूद करण्यात आली आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशननुसार अहमदाबाद-मुंबई मार्गाची लांबी ५०८ किलोमीटर आहे.

प्रकल्प पाच टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात सूरत-बिलिमोरा सेवा सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात हा मार्ग वापीपर्यंत वाढवला जाईल. तिसऱ्या टप्प्यात सूरतपासून अहमदाबादपर्यंत ट्रेन धावेल. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ठाणेपर्यंत मार्ग तयार होईल आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईपर्यंत सेवा पूर्णता्या उपलब्ध होईल.

या मार्गावर १२ स्थानके असतील. मार्गाचा सुरुवातीचा बिंदू गुजरातमधील साबरमती असेल. त्यानंतर अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे येणार आणि शेवटी मुंबई येथे ट्रेन थांबेल. मार्गाचा ३४८ किलोमीटर हिस्सा गुजरातमध्ये, १५६ किलोमीटर महाराष्ट्रात आणि ४ किलोमीटर दादरा-नगर-हवेलीमध्ये आहे.

बुलेट ट्रेन ३२० किमी प्रतितास वेगाने धावेल. ५०८ किमीचा अंतर अवघे २ तास ७ मिनिटांत पार होण्याचा अंदाज आहे. भारतातील या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची पूर्णता याच वेळी होणार आहे, याची मोठी अपेक्षा आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *