Bigg Boss Marathi ६: लावणीसम्राज्ञी राधा पाटीलची धमाकेदार एन्ट्री, गौतमीला सार्वजनिक आव्हान!

आदित्य कदम
1 Min Read

बिग बॉस मराठी ६ च्या प्रिमिअरने अचानक एक नवीन आणि चकित करणारी बाजू दाखवली. मंचावर अचानक ‘लावणीसम्राज्ञी’ राधा पाटील डान्स करत उभी राहिली. तिच्या या धमाकेदार एन्ट्रीने जणू काय संपूर्ण वातावरणच बदलून टाकले.

तिच्या नृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधले. इथेच नाही तर राधा पाटीलने आपल्या पहिल्या विधानानेच चर्चा सुरू केली. मंचावर उभं असताना तिने आपल्याहून लावणीत प्रख्यात असलेल्या गौतमी पाटीलला एक खुलं आव्हान दिलं.

राधाने गौतमीला पाहून सांगितलं की ती घरात आली आहे आणि आता त्यांच्यात खरा मुकाबला होणार. या एका वाक्याने घरातील स्पर्धकांची तास बदलली. रितेश देशमुख यांनी राधाचं स्वागत करून तिला शुभेच्छा दिल्या, पण राधाच्या भाषेतून जो आव्हानाचा स्पष्ट संदेश गेला तो आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

लावणीच्या जगातील ही दोघं अगदी वेगळ्या स्टाइलमध्ये ओळखल्या जातात. राधाच्या या आव्हानामुळे आता बिग बॉस मराठी ६ च्या घरात कशी रंगत निर्माण होईल आणि या दोघांमध्ये काय संघर्ष होईल, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *