महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शहरी भागात या निवडणुकीने पाऊल टाकले आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपच्या सत्तेची झळक आहे. महापालिका निवडणुक निकाल २०२६ मध्ये भाजपला मोठी सफलता मिळाली आहे. शहरी भागात बदलीला पाऊल टाकले आहे.
अमरावतीत भाजपला २५ सीट्स मिळाल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ४५ नगरसेवक निवडून आले होते. आता त्यापैकी नव्हे तर २५ सीट्सवर थांबावं लागलं आहे. यामुळे रवी राणा यांनी भाजपचा व्यवस्थित गेम केला अशी प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर यांनी भाजप वर टीका केली आहे. त्यांच्या मते, भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज पडणार आहे.
रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचा व्यवस्थित गेम केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या मते, भाजपसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ सभा घेतल्या. अनेक आमदार मंत्री प्रचारात उतरले होते. मात्र त्यांना जनतेने नाकारल आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाली आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
अमरावती महानगरपालिकेमध्ये रवी राणा यांचे युवा स्वाभिमान पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थाना समोर मोठा जल्लोष दिसला. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी मतदारांचे मानले आभार. या पक्षाच्या १६ जागेवर नगरसेवक निवडून आले आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आणली आहे. तब्बल ११९ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.
पुणे शहराच्या प्रभाग क्रमांक नऊ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले आहेत. बालवडकर यांनी विजयी झाल्यावर भाजपवर जोरदार टिका करत डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये म्हटले. पुणेकरांनी तुमच्याकडे बघून नव्हे तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कामाकडे बघून मतदान केलं असल्याच यावेळी त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांचा पराभव झाला. प्रभाग ४१ मधून नाना भानगिरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. हिंदुत्वनिष्ठ सेवक कधीही पराभवाने खचत नाही, असा विश्वास भानगिरे यांनी व्यक्त केला. पराभवानंतर आता त्यांनी भावनिक पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ६ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. संपूर्ण चार उमेदवाराचे पॅनल निवडून आले आहे. या पॅनलमधून निवडून आलेले संकेश भोईर यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विशेष शब्दांत शुभेच्छा दिल्या.
नागपूर महानगर पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांना पराभवाचा धक्का लागला. भाजपचे तरुण उमेदवार योगेश पाचपोर यांनी विजय मिळवत नगरसेवकपदाची बाजी मारली. आमदारकीनंतर पुन्हा नगरसेवक होण्याचे गजभिये यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. योगेश पाचपोर ठरले जायंट किलर. प्रकाश गजभिये यांचा ६ हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला.
मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी नवी मुंबईत आले होते. निवडणुकीत भाजपचे ६५ उमेदवार विजयी झाले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी नगरसेवकांचे अभिनंदन करीत भविष्यात चांगले काम करण्याची सुचना केली. शहराची वेगळी ओळख निर्माण होईल असे अभिनव उपक्रम राबवा. शासकीय विविध संस्थांमध्ये सध्या साडेसहाशेहून अधिक पदे रिक्त असून, सक्षम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांना न्याय देण्यात येईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली. इतिहासात पहिल्यांदा नांदेड महापालिकेत भाजपाचा महापौर बसणार आहे. महापालिकेच्या एकूण ८१ जागांपैकी भाजपाने तब्बल ४५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड महापालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपाने ही निवडणूक स्वबळावर लढली आणि जिंकली. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.
महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आज कोल्हापुरातील पॅवेलियन हॉटेल इथ आयोजित करण्यात आला आहे. जे होते मनात तेच घडले मनपात अशी टॅगलाईन घेऊन महायुती आता महापालिकेचा कारभार करण्यास सज्ज झालेली आहे. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेवर महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता महापौर कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुक नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे. आता लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे; गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून होणार आहे.
खोपोली उपनगराध्यक्ष पदी भाजपच्या विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोपोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान झाले आहेत. पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम साबळे यांना ही संधी देण्यात आली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत झाले. अमरावतीच्या नवसारी प्रभागातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे पराभूत झाले. अवघ्या २७ वर्षीय भाजपचे उमेदवार ऋषिकेश देशमुख यांचा तब्बल २२०० मतांनी विजय झाला. राष्ट्रवादीसह भाजपने केली होती या ठिकाणी प्रतिष्ठेची निवडणूक. माझी निवडणूक लोकांनी हातात घेतली म्हणून माझा विजय झाला विजानंतर ऋषिकेश देशमुख यांची प्रतिक्रिया. अमरावती शहरातील विकास कामे सीसीटीव्हीचा मुद्दा मार्गी लावणार.
युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. १६ जागेवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थाना समोर मोठा जल्लोष दिसला. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी मतदारांचे मानले आभार.
भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर लाठ्या काठ्यांसह तुफान दगडफे झाले. छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील गांधी नगरमध्ये मध्यरात्री झाली दगडफेक. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर दगडफेक तुमच्यामुळे निवडणूक हरलो म्हणत शिंदे सेनेच्या उमेदवार मिल्लू चावरिया याच्या टोळक्याने दगडफेक केल्याचा आरोप. टोळक्याकडून झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. दगडफेक प्रकरणी १४ जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दारु उधार न दिल्याच्या रागातून दारुड्याकडुन बीअरबारमध्ये तुफान हाणामारी धाराशिवच्या परंडा शहरातील बीअरबारमधील घटना. बिअरबारचे मॅनेजर जनार्धन चंदर भोये व मालक बत्तीनी गौड यांच्यावर लाकडी काठी – कॅरेटने हल्ला. दोघे जखमीमारहाणीची संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद. चौघांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल. बिअरबार मालक बत्तीनी गौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वास उर्फ बापु अंकुश भानवसे, रोहित विश्वास भानवसे, महेश मच्छिंद्र भानवसे व अशोक मच्छिंद्र भानवसे यांच्याविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल.
बारामतीतल्या बैठकीत निर्णय घेतला आहे की आगामी निवडणुकीत तुतारी घड्याळाची युती मनपा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणूक लढणार. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार बारामतीतल्या बैठकीत निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात विकासाचा खरा धुरंदर कोण आहे महाराष्ट्राचे जनतेला आता माहित झालेल आहे. तोंडाचा वाफा काढणारे रहमान डोक्यात कोण आहे आता महाराष्ट्राच्या जनतेला माहित झालेला आहे असे परिनय फुके, भाजप नेते यांनी सांगितले.
मुंबईत भाजपाचा स्ट्राईक रेट ६६ टक्के राहिला आहे. मुंबईत असा राहिला स्ट्राईक रेट. पक्ष : लढलेल्या जागा/जिंकलेल्या जागा/स्ट्राईक रेट. भाजपा : १३५/८९/६६ टक्के. उबाठा : १६०/६५/४०.६२ टक्के. शिवसेना शिंदे : ९०/२९/३२.२२ टक्के. काँग्रेस : १५१/२४/१५.८९ टक्के. शरद पवार राष्ट्रवादी : ११/१/०.९० टक्के. मनसे : ५३/६/०.८६ टक्के. राष्ट्रवादी काँग्रेस : ३७/३/०.८१ टक्के.
मुंबईत मतांची टक्केवारी अशी राहिली. भाजपा : ४५.३९ टक्के. उबाठा : २७.३७ टक्के. शिवसेना : १०.२८ टक्के. काँग्रेस : ९.४१ टक्के. मनसे : २.९१ टक्के.
राज्यात पक्षांनी २०१७ च्या तुलनेत अशे कमाविले यश. भाजपा : २०१७ : १०९९/आता १४००. शिवसेना : २०१७ : ४८९/आता ४१० (उबाठा : १५५). काँग्रेस : २०१७ : ४३९/आता ३५७. राष्ट्रवादी काँग्रेस : २०१७ : २९४/आता १६३ (शरद पवार : ३५). मनसे : २०१७ : २६/आता १२. अन्य : २०१७ : २९६/आता ३२४. अपक्ष : २०१७: ८९/आता १८.
महापालिका निवडणूक २०२६ मध्ये राज्यातील स्ट्राईक रेट असा राहिला. भाजपा : २२०९ उमेदवार/१४०० विजयी/६३.३८ टक्के. शिवसेना : १४९३ उमेदवार/४१० विजयी/२७.४६ टक्के. राष्ट्रवादी : १३५५ उमेदवार/१६३ विजयी/१२ टक्के. उबाठा : १२७५ उमेदवार/१५५ विजयी/१२.१५ टक्के. शरद पवार : ५३३ उमेदवार/३५ विजयी/६.५६ टक्के. काँग्रेस: १३५९ उमेदवार/३५७ विजयी/२६.२७ टक्के. मनसे : ३३० उमेदवार/१२ विजयी/३.६४ टक्के. एमआयएम: ४२३ उमेदवार/१२६ विजयी/२९.७८ टक्के. आम आदमी पार्टी : ४५५ उमेदवार/० विजय/० टक्के.
बुलढाणा जिल्ह्यात ० ते ४० वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी मोहीम सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात सिकलसेल या आनुवंशिक आजाराचे सुमारे ३०० रुग्ण नोंदणीकृत असून, या रुग्णांची वेळोवेळी तपासणी व उपचार आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. सिकलसेल हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार असून, वेळेत निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करता येतात. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार, या आठवड्यात जिल्ह्यातील ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण भागात विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र २० जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र २० जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. शाळांनी या प्रवेश पत्रांची मुद्रीत प्रत विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य मंडळांनी दिले आहेत. दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवर ६४ लाखांच्या गुटख्यासह कंटेनर जप्त झाला आहे. रायगडच्या खालापूर पोलिसांनी गुटखा तस्करांवरोधात मोठी कारवाई करत ६४ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टोल नाक्या जवळ करण्यात आली आहे. या प्रकरणी शेख रशीद रहेमान आणि गणेश वानखेडे अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर आणि गुटखा मिळून १ कोटी ३ लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
रत्नागिरी तालुक्यात १० जिल्हा परिषद आणि २० पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रशासकीय यंत्रणा या ‘लोकशाहीच्या उत्सवा‘साठी सज्ज झाली असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मतदानासाठी रत्नागिरी तालुक्यात एकूण २७१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी‘ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श‘ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण ७०७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली असल्याची माहिती जीवन देसाई यांनी यावेळी दिली.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आ.सावंत आणि धनंजय सावंत यांच्यामध्ये बिनसल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिका निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाल्यानंतर आता लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून होणार आहे. आता लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे; गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून होणार आहे. कोल्हापूर महानगर पालिकेवर महायुतीने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता महापौर कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुक नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक मध्ये कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ६ मध्ये शिवसेना उद्धव सेनेचा दणदणीत विजय झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक मध्ये कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक ६ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. संपूर्ण चार उमेदवाराचे पॅनल निवडून आले आहे. या पॅनलमधून निवडून आलेले संकेश भोईर यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विशेष शब्दांत शुभेच्छा दिल्या. पॅनल क्रमांक ६ मध्ये माजी महापौर तसेच दिग्गज नगरसेवक विरोधात उभे असतानाही मतदारांनी शिवसेना उबाठा वर विश्वास दाखवत संपूर्ण पॅनल विजयी केला. हा विजय स्थानिक पातळीवर शिवसेना उबाठाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि मतदारांच्या पाठिंब्याचे स्पष्ट प्रतिबिंब मानला जात आहे. विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल वरून संकेश भोईर व संपूर्ण विजयी पॅनलचे अभिनंदन करत, शुभेच्छा दिल्या. या यशामुळे कल्याण पश्चिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, आगामी काळात महापालिकेत प्रभावी भूमिका बजावण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय: राज्यातील २९ महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत, शहरी भागात बदलीला पाऊल असे निकाल जाहीर झाले आहेत. महापालिका निवडणुक निकाल २०२६ मध्ये भाजपला मोठी सफलता मिळाली आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपच्या सत्तेची झळक आहे. शहरी भागात बदलीला पाऊल टाकले आहे.