बिग बॉस मराठी ६ च्या घरातून आज सोनाली राऊतला नारळ मिळाला आहे. फक्त दुसऱ्या आठवड्यातच तिला शोमधून बाहेर जावं लागलं.
रितेश देशमुखने आजच्या भागात स्पर्धकांना धारेवर धरलं. त्याने प्रभू, सागर, तन्वी आणि इतरांना त्यांच्या वागणुकीबद्दल सुनावणी दिली. नंतर रितेशने इमोजी टास्क घेतला ज्यामध्ये मुलींची टीम विजयी ठरली.
बुद्धिबळाच्या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकमेकांची सोंगं ओळखली. अनुश्रीने सागरला ‘राजा’ तर सोनालीला ‘उंट’ म्हटलं. यानंतर चुलीत फोटो टाकण्याच्या गेममध्ये सोनालीच फॉर्मवर आली. तिचा फोटो रोशन आणि तन्वीनी चुलीत टाकला.
एलिमिनेशन प्रक्रियेत प्रथम विशाल, रुचिता आणि सोनाली धोक्यात होत्या. रुचिता आणि विशाल सेफ ठरताना सोनाली डेंजर झोनमध्ये राहिली. नंतर करण, प्राजक्ता आणि ओमकार येताच प्राजक्ता-करण बचावले तर ओमकार धोक्यात गेला.
अंतिम टप्प्यात सोनाली आणि ओमकार यांच्यात झालेल्या स्पर्धेत ओमकार सेफ ठरला. अशाप्रकारे स्पर्धकांच्या मतांनुसार सोनाली राऊत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.