**मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार**
रेशन कार्ड धारकांसाठी मोठा बदल होणार आहे. १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार असून, घरात चारचाकी असेल, एसी असेल किंवा कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड कायमचे बंद करण्यात येणार आहे. हा नवा नियम रेशन कार्डधारकांच्या पात्रतेतील काटेकोर छाननी करण्यासाठी आहे.
रेशन कार्ड धारकांची काटेकोर छाननी होणार आहे. गरजूंपर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी सुधारित नियमावली जारी करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्य सक्षम असणाऱ्यांची नावे यादीतून रद्द करण्यात येणार आहे. देशात सुमारे ७० लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे हा नियम १ एप्रिलपासून (new ration card eligibility criteria from April 1) लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्त निकषात बसणाऱ्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार आहे. फक्त गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
घरात एसी, जनरेटर असेल अथवा कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तरीही रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर खोटी अथवा चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून ईकेवायसी करण्यात येत होती. ई केवायसी केली नाही तरीही लाभ बंद करण्यात येणार आहे.
रेशन कार्ड नवीन नियम हे एका नवीन स्तरावर जाऊन जात आहेत. त्यामुळे रेशन धारकांना त्यांच्या पात्रतेतील परीक्षा घेतली जाईल. त्यामुळेच रेशन कार्ड धारकांना नवीन नियमांची तपशीलवार माहिती घेण्याची गरज आहे. १ एप्रिलपासून ही बदल सुरू होईल.