**महाराष्ट्रातील ताजी घडामोडी: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, पुण्यात गॅस सिलेंडरचा काळाबाजार, यवतमाळमध्ये इंधन साठवण्याची लगबग**
महाराष्ट्रातील ताजी घडामोडी आजच्या ताज्या बातम्यांमध्ये स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 20 सदस्य निवडून आल्यामुळे त्यांच्याकडे अध्यक्षपद द्यावे, अशी भूमिका घेण्यात आल्याचे सांगितले जाते. भाजपने जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने हे पद मिळवण्याचा प्रयत्न केला होता. येत्या मंगळवारी, 17 तारखेला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार असून त्याआधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील गॅस घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी सिंहगड रोड पानमळा परिसरात नागरिकांच्या रांगेत असून त्यांना गॅस घेण्यासाठी थांबले आहेत. गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे त्याचा परिणाम घरगुती गॅसवर ही झाली. सिंहगड रोड वरती असलेल्या गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर रांगा करून नागरिक गॅस घेण्यासाठी थांबले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे त्याचा परिणाम घरगुती गॅसवर ही झाली. सिंहगड रोड वरती असलेल्या गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर रांगा करून नागरिक गॅस घेण्यासाठी थांबले आहेत.
यवतमाळमध्ये ग्रामीण भागात इंधन साठवण्याची लगबग यवतमाळ जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी सिलेंडर मिळण्यास होणाऱ्या विलंबनामुळे ग्रामीण भागात नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेकडे वळण्यास सुरुवात केली आहे. गॅस जास्त दिवस चालावा यासाठी अनेक घरांमध्ये पुन्हा चुली पेटू लागल्या असून महिलांकडून रानातून इंधन गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे.
पुणे शहरातील वस्तीगृह रुग्णालयांना घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. या बाबतीत त्यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून दररोज सुमारे १० हजार सिलेंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के सिलेंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे. गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून पुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.