Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. eKYC पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. आता या महिलांना पुन्हा एक संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील अनेक महिलांनी सरकारकडे eKYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. काही महिलांकडून eKYC झाली नाही, तर काहींच्या माहितीमध्ये चुका राहिल्या. त्यामुळे पात्र असूनही त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातच जवळपास १ लाख महिला अजूनही eKYC पासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता वाढली आहे. लाभ कायमचा बंद होऊ नये, यासाठी महिलांनी संबंधित कार्यालयात अर्ज करून मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. १५ किंवा १६ मे रोजी महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय सकारात्मक होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांतूनही अशीच मागणी करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाकडे यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यामुळे सरकार या विषयावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वाढली आहे.
याशिवाय, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना तीन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची माहितीही समोर आली आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे मिळून ४५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र, त्यासाठी पडताळणी आणि eKYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
आता सरकारच्या निर्णयाकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. मुदतवाढ मिळाल्यास अनेक महिलांचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.