गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यात अपघात; चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

योगेश चव्हाण
1 Min Read

Gautami Patil : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यात एका रिक्षावर अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक व दोन प्रवासी जखमी झाले आहेत. गौतमी पाटील या वेळी कारमध्ये नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अपघात झाल्यानंतर कारचा चालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याची वैद्यकीय चाचणी करून चौकशी केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे पाच वाजता गौतमी पाटीलची कार एका हॉटेलसमोर उभी असलेल्या रिक्षाला मागून आदळली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. जखमी झालेल्या रिक्षाचालक आणि प्रवास्यांना स्थानिक लोकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या गौतमी पाटील अपघातामुळे त्या परिसरात थोड्या वेळात रहदारीचा गोंधळ निर्माण झाला. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सध्या कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *