ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे देशात अनेक नवीन नियम लागू होत आहेत. या नियमांमध्ये PPF, NPS, गॅस सिलिंडर, रेल्वे आणि UPI यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे नियम बदलल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे.
पीपीएफ, एससीएसएस, एसएसवाय आणि पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर बदलू शकतात. हे व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलतात. त्यामुळे ऑक्टोबरपासून नवीन दर लागू होतील.
घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल होणार आहे. एक ऑक्टोबरपासून सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना थोडे आर्थिक सुटण्याची शक्यता आहे.
रेल्वे तिकीट बुक करताना आता एक मोठा बदल होत आहे. ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन गरजेचे झाले आहे. तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांत फक्त आधार व्हेरिफाई केलेले लोकच तिकीट काढू शकतील. काऊंटरवरून तिकीट काढणाऱ्यांसाठी जुने नियमच लागू राहतील.
यूपीआय मधील काही वैशिष्ट्ये बदलली जात आहेत. सिलेक्ट रिक्वेस्ट आणि पुल ट्रान्झॅक्शन असे फीचर्स आता बंद केले जात आहेत. नवीन नियमांनुसार, यूपीआयद्वारे आता एका वेळी पाच लाख रुपये पाठवता येतील.
नेशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएस योजनेतही मोठा बदल झाला आहे. या योजनेत आता किमान वार्षिक योगदान फक्त एक हजार रुपये असेल. याआधी ही रक्कम सहाशे रुपये होती.
एनपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाईट यासारख्या पेन्शन योजनांचे नियम सध्या बदलले आहेत. बिगर सरकारी गुंतवणूकदार आता त्यांच्या एनपीएस खात्यातील संपूर्ण पैशांची गुंतवणूक शेअर बाजारात करू शकतात.
ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातही नवे नियम लागू होत आहेत. सर्व गेमिंग कंपन्यांना आता इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून परवाना घेणे गरजेचे आहे.
पोस्ट ऑफिसच्या सेवाशुल्कातही बदल झाले आहेत. स्पीडपोस्ट आणि ऑनलाइन बुकिंगसाठी नवीन नियम लागू होत आहेत. यामध्ये ओटीपीवर आधारित डिलिव्हरी आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना काही सवलतीही देण्यात आल्या आहेत.
हे सर्व ऑक्टोबर नियम बदल लोकांच्या आर्थिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार आहेत. त्यामुळे या बदलांची माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे.