बिग बॉस मराठी ३ चे उपविजेते जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नानंतरच्या काही दिवसांतच पोलिस कारवाईाली आहे. जयला मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जय दुधाणेवर बनावट कागदपत्रं तयार करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनवट कागदपत्र तयार करुन लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. जयने केलेली ही फसवणूक ५ कोटींची असल्याचंही उघड झालंय.
यासंबंधी जय किंवा त्याच्या टीमने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. जय या प्रकरणात खरंच दोषी आहे का, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
जय दुधाणे ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये जबरदस्त खेळ करुन उपविजेतेपद पटकावलं होतं. तो अभिनेता आणि जिम व्यावसायिक आहे. तो लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात काम करणार आहे.
जयने काहीच दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला काहीच दिवस झाले असताना जयला अटक झाली आहे.