**क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलणार**
क्रेडिट आणि डेबिट कार्डवर देण्यात येणाऱ्या लाउंज प्रवेशाच्या नियमात बदल केला जाईल. यामुळे डेबिट कार्डधारकांना विमानतळातील लाउंजमध्ये प्रवेश मिळणार नाही. हा परिवर्तन १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
हे निर्णय एनपीसीआयने केले आहे. त्यांनी बँकांना रुपे प्लॅटिनम कार्डवर देण्यात येणारे लाउंज प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कार्डधारक यापुढे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर लाउंज सर्व्हिस वापरू शकत नाहीत.
अनेक बँकांनी त्यांच्या रिवॉर्ड स्ट्रक्चरमध्ये हे बदल केला आहे. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले आहेत. हा बदल केवळ लाउंज प्रवेशापुरते मर्यादित नाही. काही कार्डांवर खर्चावर आधारित कॉम्प्लिमेंटरी लाउंज एन्ट्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डवरील लाउंज बंद केला जाणार आहे. तसेच यासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर रुपे सिलेक्ट कार्डधारकांना तिमाहीत ५००० रुपये खर्च करणे आवश्यक आहे.
हा नवीन नियम डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांवर खूप प्रभाव पडणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल बँकांकडून माहिती घेऊन संवाद साधावा लागेल.