गडचिरोलीत अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे गरोदर मातेच्या मृत्यूने आता राजकीय उबदारी निर्माण झाली आहे. या घटनेच्या विरोधात आता काँग्रेस पक्षाने मोर्चा उघडला आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे धरणे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाड्यांच्या नेतृत्वात दुपारी १२ वाजता हे आंदोलन झाले. अपुऱ्या सुविधांमुळे गरोदर मातेचा आणि नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आता शासन-प्रशासनावर आरोप लागत आहेत. आजच्या या बातम्या पहा:
८ जानेवारी, २०२६ – महाराष्ट्र राज्यातील आजच्या ताज्या बातम्या आणि घडामोडींचा वृत्तांत. वाचा एका क्लिकवर…
निफाड: तालुक्यातील देवगाव परिसरात बिबट्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात पाचवा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. यापूर्वी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते, ज्यानंतर या भागात पिंजरे लावण्यात आली. परसराम बोचरे यांच्या मालकीच्या शेतात बिबट्या पकडल्याने स्थानिकांनी राहतल्याचे सांगितले.
सावनेर: तालुक्यातील खैरी ढालगाव येथे दूषित पाण्यामुळे आरोग्य संकट निर्माण झाले आहे. या गावातील ८० नागरिकांची प्रकृती खालावली आहे. ३ जानेवारीला मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटल्यामुळे दूषित पाणी नळाद्वरे घरात पोहचले. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसापासून कॅम्प सुरू आहे. पोटदुखी, हगवण आणि उलटीच्या त्रासाने लहान मुले आणि वयोवृद्ध पीडीत झाले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, ग्रामपंचायत प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
नंदुरबार: जिल्ह्यात नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि वापर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस. यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात मोठ्या प्रमाणावर मांजा जप्त करण्यात आले आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीवर भर दिला जात आहे. नागरिकांनी ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन येथे तळ ठोकून निवडणुकीच्या रणनीतीसाठी तयारी सुरू आहे. भाजपाचा नाशिकमध्ये शंभर प्लस चा नारा असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठी भेटी घेऊन गिरीश महाजन कार्यकर्त्यांना उत्साहित करत आहेत. शहरातील तीनही विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीची तयारी सुरू आहे.
बुलढाणा: जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८, ९ आणि १० जानेवारी या तीन दिवसांत विविध कार्यक्रम होणार आहेत. १० जानेवारी रोजी महाप्रसादाचे भव्य वितरण होईल. यासाठी ३५० क्विंटल गव्हाची पुरी आणि वांग्याची भाजी तयार करण्यात येणार आहे. ट्रक्टरच्या साहाय्याने महाप्रसाद वितरण करण्यात येणार असून, लाखो भाविकांना सुव्यवस्थित पोहोचवण्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
अमरावती: तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणूक प्रचारात सक्रिय असल्याचे सीसीटीव्ही समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष हा आरोप काँग्रेस उमेदवार राजू पवार यांनी केला आहे. पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी आणि विविध गुन्ह्यांमुळे अनिल भोसले यांना तडीपार केले आहे. शिवाजीनगर वाकडेवाडी या भागात ते प्रचारासाठी फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. काळी जादू करण्यासाठी तांत्रिक साहित्य आणल्याचेही सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहे.
परभणी: शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमधून सहा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर पदाधिकाऱ्यांना भाजपचे शहर अध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी भाजपमधून हकालपट्टी करत कारवाई केली. पक्षांची शिस्त मोडल्यामुळे ही कारवारी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कानावर टाकत शिवाजी भरोसे यांनी सहा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
नागपुर: शोध मोहिमेनंतर नागपुरात दुबार मतदारांची संख्या उघडकीस आली आहे. एकूण २४ लाख ८३ हजार ११२ मतदार नोंदणीकृत आहेत. तपासणीत ६५ हजार २८१ दुबार मतदार असल्याचे स्पष्ट झाले. २९ हजार ९१२ मतदारांची नावे समान आहेत, मात्र व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. समान नाव असलेले मतदार स्वतंत्र असल्याची खात्री चुनिणी आयोगाने केली. त्यामुळे मतदारांच्या नावांपुढील दोन स्टार चिन्ह हटवण्यात आले आहे. आतापर्यंत ३ हजार १९० दुबार मतदारांनी संमतीपत्र भरले आहे.
पुणे: सासवड आणि पुणे शहराला जोडणारा बोपदेव घाट आजपासून १४ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे. वाहनचालकांनी या मार्गाकडे न वळण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर: कालच्या राड्याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखलकाला आहे. MIM ची रॅली जिन्सी चौकात पोहोचली असताना समोरून काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली आली. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली, ज्याचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि अंडी भिरकावण्यामध्ये झाले. त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांना सौम्य लाठीचार करावा लागला होता.
जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भीषण अपघात घडला आहे. उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात अपघात झाला. घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण की वाहनाचे मोठे नुकसान झाले. चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई: हार्बर रेल्वे उशिराने धावत आहे. प्रवाशांचा जवळपास अर्धा ते पाऊण तास खोळंबा होत आहे.
नाशिक: नायलॉन मांजा पासून बचावासाठी दुचाकी स्वरांना सेफ्टी स्टिकचे मोफत वाटपन शिकच्या येवला शहरात तेजतारा वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने केले. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवला. दुचाकीस्वार, डिलिव्हरी बॉय आणि नियमित प्रवासी यांना सेफ्टी स्टिकचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “नायलॉन मांजा म्हणजे मूक मृत्यू – सजग राहा, सुरक्षित रहा” हा संदेश देत जनजागृती केली.
बुलढाणा: जिल्ह्यातील पळशी सुपो महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या जळगांवजामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे पौष महिन्यात यात्रेला सुरुवात झाली. पुढील तीन आठवडे यात्र सुरु राहते. देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रेत आकाश पाळणे, लहान मुलांचे खेळ, विविध प्रकारची खेळणी, दराबा आणि प्रसिद्ध असलेल्या दाळ्या रेवड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. जळगांव जामोद एस. टी. आगरा कडून तगडा पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे.
लातूर: दिल्ली आणि मुंबई हून येणाऱ्या पैशाला कात्र्या लागतात असा आरोप काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केला आहे. सरकारच्या निधिला जागोजागी कात्री लागत असल्याचा आरोप त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांवर केला. एक कात्री निलंग्याची लागते, दुसरी औसा, तर तिसरी कात्री ही लातूर ग्रामीणची, आणि चौथी उदगीरची कात्री लागत असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
नांदेड: त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आजपासून इम्तियाज जलील यांच्यासोबत १० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन बंदूकधारी पोलीस देखील सुरक्षेत असणार. पोलीस उपनिरीक्षकसह पोलीस कर्मचारीसोबत असणार.
वाशिम: नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना कर थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे पालिकेला मोठा फायदा झाला आहे. चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांची करवसुली झाली. एकट्या वाशिम नगरपालिकेतच निवडणूक काळात १ कोटी २३ लाख रुपयांची कर वसुली झाली. निवडणूक प्रक्रियेमुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडल्याचं चित्र समोर आलं आहे.
नागपुर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून निवडणुकीच्या रणनीतीसाठी सक्रिय झाले आहेत. बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचा नाशिकमध्ये शंभर प्लस चा नारा घेणार प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठी भेटी शहरातल्या तीनही विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेणार भेटी.
गडचिरोली: अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन झाले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृवात धरणे आंदोलन करण्यात आले. गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आल्याने आता आंदोलनाचे रूप घेतले आहे.
बुलढाणा: गोपीचंद पडळकरांच्या मंत्रीपदासाठी विठुरायाला साकडे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी आटपाडीचे नगराध्यक्ष उत्तम जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आटपाडी ते पंढरपूर अशी ६० किलोमीटर पदयात्रा काढून विठुयाराला साकडे घातले. सलग २१ तास चालत येवून आज सकाळी आमदार पडळकर समर्थकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. सर्वसामान्य,वंचित लोकांचे नेतृत्व करत असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळू दे असे साकडे विठुरायाला घातल्याचे नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी सांगितले.
मुंबई: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा पार पडला. भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आमदार महेश चौघुले समर्थकांचा कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत पोलिसांच्या उपस्थिती मध्ये राडा घालण्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपाने पॅनल उभे केले आहे. भाजपा आमदार महेश चौघुले विरोधात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील निवडणूक लढवली होती. तेव्हा पासून या दोन गटात वाद आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी महापौर विलास पाटील पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपा आमदार महेश चौघुले यांनी भाजपाचे पॅनल उभे केले ज्यामध्ये त्यांचा मुलगा मित चौघुले निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मुंबई: भाजपच्या स्थानिक आमदारांवर घणाघात अमित देशमुख यांनी केला आहे. दिल्ली आणि मुंबई हून येणाऱ्या पैशाला कात्र्या लागतात असा आरोप त्यांनी केला. एक कात्री निलंग्याची लागते, दुसरी औसा, तर तिसरी कात्री ही लातूर ग्रामीणची, आणि चौथी उदगीरची कात्री लागत असल्याचं काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
मुंबई: ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रदूषण मुक्त पर्यावरण करणे हेच माधव गाडगीळ यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल या शब्दात अजित पवार यांनी माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असा संदेश देणारे माधव गाडगीळ सर ८३ वर्षांचे होते. डॉ शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंकर करण्यात येतील.
मुंबई: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवक आज भाजपात प्रवेश करत आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा प्रवेश होत आहे. नवीमुंबईसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध.
मुंबई: आज गुरूवार, दिनांक ८ जानेवारी २०२६, महापालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा, राज-उद्धव यांची संयुक्त मुलाखत, देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत, राज्यात थंडी परतली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर. सकाळ+चे सदस्य व्हा शॉपिंगसाठी ‘सकाळ प्राईम डील्स’ च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.