करवा चौथ आधी हार्दिक पांड्या ‘या’ करोडपती मॉडेलसोबत दिसला; खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण

आदित्य कदम
2 Min Read


क्रिकेटर हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतेच आशिया कप संपल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण म्हणजे, हार्दिक पांड्या पुन्हा एकदा एका नव्या मुलीसोबत दिसला आहे. या दोघांच्या दिसण्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

सध्या हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी दिल्लीतील असून ती एक करोडपती मॉडेल आहे. या नवीन गर्लफ्रेंडचे नाव माहिका शर्मा आहे. नुकताच माहिका शर्मा आणि हार्दिक पांड्या एका व्हिडिओमध्ये एकत्र दिसले.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्मा ही चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकची नवीन हेअरस्टाइल पाहायला मिळत आहे. तसेच, त्याने नुकतीच खरेदी केलेल्या 4.5 कोटी रुपयांच्या लँबॉर्गिनी कारची झलकही दिसत आहे. याच नवीन कारमधून ते दोघे विमानतळावर पोहोचले होते.

माहिका शर्मा ही इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिने दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. तिने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये पदवी मिळवली आहे. तिच्याकडे अंदाजे 3.2 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड ही कोट्यधीश असल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, करवा चौथच्या अगदी आधी हार्दिक पांड्या माहिकासोबत दिसल्यामुळे या दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना अधिक रंगत आली आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याचे नाव ब्रिटिश गायिका जॅस्मिन वालियासोबत जोडले गेले होते, पण ते नाते फार काळ टिकले नाही.

हार्दिक पांड्याच्या पहिल्या लग्नाची गोष्टही खूप फिल्मी आहे. त्याने नताशा स्टँकोविचसोबत लग्न केले होते. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. दोघांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. हार्दिकने नताशाला क्रूझवर प्रपोज केले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच दोघांनी घटस्फोट जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता.

आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. माहिका शर्मासोबतच्या या नवीन नात्यावर चाहते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *