हाऊसिंग सोसायटी मेंटेनन्स फंड गैरवापर: तक्रार कसे करावी? कायदेशीर व्यवहार
हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स फंडात घोटाळा झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रहिवासी सहकारी संस्थांच्या निबंधकांकडे संपर्क साधू शकतात, ऑडिटची मागणी करू शकतात. हा गैरवापर हे पैसे गरजेच्या सेवांशी नसून व्यावसायिक लाभासाठी वापरले जात असतात.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, सोसायटीचे पदाधिकारी किंवा व्यवस्थापन समिती हे पैसे गैरवापर करत असल्याचे प्रकार समोर येत असतात. याबाबतची तक्रार कुठे करावी याची माहिती नसल्यानं नागरिकांना पैसा अशाच सोडून द्यावा लागतो. तक्रार करण्यासाठी, सोसायटीच्या व्यवस्थापन समितीकडे लेखी तक्रार करावी. मेंटेनन्स खर्चाचे तपशील, बिलांची प्रत, बँक स्टेटमेंट आणि वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मागण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार असतो.
जर घोटाळ्याची रक्कम मोठी असेल आणि फसवणूक, विश्वासघात किंवा बनावट कागदपत्रांचा संशय असेल, तर थेट महाराष्ट्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येतो. सिव्हिल कोर्ट आणि ग्राहक मंच सोसायटीच्या कारभारामुळे सदस्यांना आर्थिक नुकसान झाले असेल तर दिवाणी न्यायालयात (सिव्हिल कोर्ट) दावा दाखल करता येतो. तसेच मेंटेनस सेवा योग्य न मिळाल्याने त्रास झाला असल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक मंचातही तक्रार करता येते.
हाऊसिंग सोसायटीला “सेवा पुरवठादार” मानण्यात आले आहे. याशिवाय जर इमारत पूर्णपणे हस्तांतरित झालेली नसेल आणि बिल्डर किंवा डेव्हलपर सहभागी असेल, तर महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महाRERA) कडेही तक्रार दाखल करता येते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, कुठेही तक्रार करताना मेंटेन्स पावत्या, बँक स्टेटमेंट, ऑडिट रिपोर्ट, मीटिंगचे मिनिट्स आणि पत्रव्यवहार यांची प्रत जपून ठेवा. हे पुरावेच कायदेशीर लढाईत महत्त्वाचे ठरत असतात.
सकाळीचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी ‘सकाळ प्राईम डील्स’च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.