महाराष्ट्राच्या शैक्षणिक ओळखीला आता नवा मुक्काम मिळाला आहे. आयआयएम मुंबईचे नवीन केंद्र पुण्यात उघडण्याचा निर्णय घेतला असून यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
आयआयएम मुंबईच्या डीन कमिटीने आणि नंतर विद्या परिषदेनं या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनाने पुणे शैक्षणिक नगरी म्हणून आपली भूमिका बळकट होईल आणि “नॉलेज कॉरिडॉर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन शैक्षणिक मार्गाची निर्मिती होईल.
पुणे हे देशातील प्रमुख तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र बनत असताना, नवीन आयआयएम केंद्र विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील व्यवस्थापन शिक्षणाची संधी देईल. या कॅम्पसकडून २०२६ शैक्षणिक वर्षात क्षमता विकास कार्यक्रम आणि अल्पावधीचे कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची अपेक्षा आहे.
संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले की, या नवीन उपक्रमामुळे उद्योजकतेला नवे संधी मिळतील आणि व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून कल्पनांना यशस्वी व्यवसायांमध्ये रूपांतर करता येईल.
आयआयएम पुणे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवीन कॅम्पसने महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवीन ऊर्जा दिली असून, विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना विस्तीर्ण क्षेत्रांतील संधी उपलब्ध करून दिल्या जातील.