IIT कानपुरमधील दुर्घटना: पीएचडी विद्यार्थ्याने ६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, एंजायटीमुळे दाखल होता उपचारांसाठी

आदित्य कदम
1 Min Read

कानपूर आयआयटीमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. २५ वर्षीय पीएचडी विद्यार्थ्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रामस्वरूप ईशराम असे त्या विद्यार्थ्याचे नाव होते.

विद्यार्थी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होता. तो आर्थ सायन्सेस विभागात पीएचडी करत होता. जुलै २०२३ पासून तो कॅम्पसमध्ये होता. त्याची पत्नी मनजू आणि तीन वर्षांची मुलगी यांच्यासोबत तो कॅम्पसमध्येच राहत होता.

घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एंजायटी आणि डिप्रेशनच्या आजाराने तो त्रस्त होता, अशी प्राथमिक माहिती आहे. त्याची काउंसलिंगही सुरू होती.

रामस्वरूप याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमासाठी पाठवण्यात आला आहे. यापूर्वी २९ डिसेंबरला बीटेकचा एक विद्यार्थ्याने अशीच आत्महत्या केली होती.

पोलिस उपायुक्त एसएम कासिम आबिदी यांनी सांगितले की, विद्यार्थी बऱ्याच काळापासून नैराश्य आणि चिंताग्रस्त होता. मृताच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, आजारपणामुळे तो तणावाखाली होता. कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *