महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या ३ ते ४ दिवसात लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता मिळू शकतो. यासंदर्भात राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना ३००० रुपये दोन्ही हप्त्यांस्वरूपात मिळण्याची प्रबल शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम मकर संक्रांतीपूर्वी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते.
याआधी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती. याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थोडा उशीर झाला होता. निवडणुकीच्या तारखा पुढे सरकारने नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता जमा केला होता. तो दिवाळीच्या वेळी लाभार्थींना मिळाला होता. आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता लवकर मिळणार आहे.
१५ जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यापूर्वी पैसे मिळणार का यावर सरकारचा निर्णय असेल. तसेच, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक होते. या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना यापुढे हप्ते मिळणार नाहीत.