महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी साडे सात वाजता मतदानाची सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदार आपला वोट टाकू शकतील. मुंबईतील बीएमसी ते पुण्याची महापालिका, नागपूर, नाशिक, ठाणे, धुळे अशा २९ शहरांमध्ये आज प्रचंड मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण २,८६९ नगरसेवकांची निवड होणार आहे.
सकाळपासूनच वेगवेगळ्या शहरांतून विविध घटना समोर येत आहेत. धुळ्यात मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनची तोडफोड झाल्याची बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील मिरच्या मारुती शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडला. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित ह्या घटनास्थळी दाखल झाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा शिंदे सेनेच्या नेत्यांनी आरोप लावला आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्धा तासाहून अधिक वेळ उलटून देखील मतदान प्रक्रिया खोळंबली आहे.
पुण्यात सकाळी ११.३० पर्यंत १४.९२ टक्के मतदान झाले आहे. ५ लाख २९ हजार ९९३ जणांनी आपल्या मताचा वापर केला आहे. प्रभाग क्रमांक २९ मधील डेक्कन जिमखाना आणि हॅपी कॉलनी येथे सर्वाधिक १८.९२ टक्के मतदान झाले. नाशिकमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४.३१ टक्के मतदान झाले आहे. अमरावती महानगरपालिकेत ११.३० वाजेपर्यंत १७.१ टक्के मतदान झाले. जळगाव महानगरपालिकेत ११.३० वाजेपर्यंत १३.३९ टक्के मतदान झाले. या आकडेवारीत पुरुष मतदारांची संख्या ३३,२५७ तर स्त्री मतदारांची संख्या २५,४४१ आहे. एकूण ५८,६९८ मतदान झाले.
विविध शहरांतून ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाच्या बातम्या येत आहेत. पुण्यातील गुरुवार पेठेत प्रभाग क्रमांक २६ मध्ये मतदान यंत्र बंद पडल्याने नागरिक संतप्त झाले. सांगलीच्या मिरजेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला. शहरातल्या प्रभात पाच मध्ये ही घटना घडली. सुमारे एक तास मशीन बंद राहिल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. शेवटी अर्ध्या तासानंतर या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आले. संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटन दाबले जात नाही, असा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे. नाशिकच्या प्रभाग २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदानाला सुरुवात झाली नाही. चंद्रपुरातील महाकाली प्रभाग क्रमांक १२ मध्ये सन्मित्र कॉन्व्हेंट केंद्रात एक ईव्हीएम बंद पडले. नाशिकच्या प्रभाग २ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला. विरोधकांनी ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकारांबद्दल आक्षेप घेतला आहे.
पुण्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६ टक्के मतदान झाले. २ लाख २६ हजार २१९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ४ हजार मतदान केंद्र आहेत. जालना शहरात पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. १६ प्रभागातील मतदान केंद्रांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर आहे. जालना शहरातील २९१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
मतदानाच्या दरम्यान प्रत्यक्षात येणाऱ्या राजकीय नेत्यांचीही बातमी आली. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांनी मतदान केले. राज ठाकरेही कुटुंबासह मतदानासाठी दाखल झाले. आई, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सुनबाई मिताली यांच्यासह मतदान केले. एकनाथ शिंदे सहकुटुंब मतदानासाठी दाखल ठाण्यातील किसन नगर येथील मतदान केंद्रात गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे मतदानासाठी आले.
मराठमोळ्या कलाकारांनीही मतदानाचा अधिकार बजावला. दिग्दर्शक अजय पूरकर, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई), अभिनेत्री स्मिता गोंदकर, गायिका आर्या आंबेकर आणि फिल्म सेन्सर बोर्ड सदस्य अश्विनी दरेकर यांनी आपले मतदान केले. सचिन तेंडुलकर यांनीही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान केले. देवयानी फरांदे, हेमंत रासने, रवी राणा, नवनीत राणा, हर्षवर्धन पाटील, तेजस्वी घोसाळकर, स्नेहा दुबे पंडित, प्रकाश जावडेकर, बाळाराम पाटील, संजय जाधव, सुधाकर बडगुजर, रवींद्र धंगेकर अशा अनेक नेत्यांनी मतदान केले.
इतर शहरांतूनही विविध घटना समोर आल्या. जळगाव महापालिकेच्या मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. नाशिकमध्ये भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या गाडीत पैसे सापडल्याचा आरोप विरोधकांनी केला. परभणीत भाजपकडून पैशांचा मारा केला जात असल्याचा खासदार संजय जाधव यांनी आरोप लावला. पनवेलमध्ये बोगस मतदानाचा आरोप मनसेकडून करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेवर बहुमत आमचंच होणार, असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केला. इचलकरंजीत पैसे वाटप करण्यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाली. अकोल्यात मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाले. चंद्रपुरात ईव्हीएम बंद पडल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार भुषण शिंगणे यांच्यावर रात्री हल्ला करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार ६७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्य इमारतीमध्ये वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेतर्गत महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर मिळून चार हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वॉर रुम उभारण्यात आली आहे.
मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. पण मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार. यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, अपंगत्वाचा दाखला, बँक पासबुक, मनरेगा रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचे दस्तऐवज, अधिकृत ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे पर्याय आहेत.
पुण्यात १६३ जागांसाठी आज मतदान होत आहे. शहरातील ४ हजार ०११ मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहे. पुण्यात एकूण ४१ प्रभाग असून १६५ जागा आहेत. चार सदस्य प्रभाग ४० असून पाच सदस्य प्रभाग एक आहे. एकूण १हजार १५५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने आज प्रत्यक्षात १६३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पुरुष मतदार १८ लाख ३२ हजार ७८९ तर महिला मतदार १७ लाख १३ हजार ३६० आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १४ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन हजार २५० होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.
धुळे महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण जागा ७४, बिनविरोध ४, ७० जागेंसाठी ३१६ उमेदवार रिंगणात आहेत. शहरात एकूण ५०७ केंद्र आहेत. संवेदनशील केंद्र १३ आहेत. एकूण चार लाख तीस हजार ३८७ मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांसह पंधराशे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेतील १३१ नगरसेवक पदाच्या मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. ३३ प्रभागात सदरची निवडणूक पॅनल पद्धतीने होत आहे. २०१३ मतदान केंद्र आहेत. १२.६५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ११ विभागांमध्ये ४४ ठिकाणी ३०५ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बीएमसी निवडणुकीत प्रभाग २२६ मधील मतदान प्रक्रियेत गंभीर गैरप्रकारांचा आरोप अपक्ष उमेदवार तेजल दीपक पवार यांनी केला आहे. मतदारांना फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे धमकावल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. मतदानाच्या दिवशी वाहनांचा वापर करून दबाव टाकण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी ट्विट करून सांगितले की, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली. अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय. काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते. काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही. हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा, असे म्हणणे रोहित पवार यांनी केले.
नाशिकमध्ये मतदान करा आणि जेवणावर १० टक्के सूट मिळवा, अशी ऑफर काही हॉटेल्स चालकांकडून देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हॉटेल चालक देखील प्रयत्न करत असल्याचा बघायला मिळत आहे.
अकोला महापालिकेत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.४८ टक्के मतदान झाले. अकोल्यातल्या प्रभाग ३ मध्ये श्रीराम नगर भागातील २५ ते ३० लोकांचे मतदार यादीतून नाव गायब असल्याचे समोर आले. यामुळे मतदारांमध्ये रोष आहे. लोकसभेचे मतदान केले, मात्र महापालिकेच्या मतदानांपासून इथल्या नागरिकांना आता दूर राहावे लागणार आहे.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये एका हॉलमध्ये भाजप उमेदवार मतदारांना पैसे वाटप करत होता. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पैसे वाटपाबद्दल जाब विचारला असता एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली.
सांगलीच्या मिरजेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला. शहरातल्या प्रभात पाच मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सुमारे १ तास या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. शहरातील जवाहरचौक येथील २६ नंबर मतदान केंद्रावरतीन मतदान झाल्यानंतर चौथे मतदान करताना मशीन बंद पडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या गोंधळ निर्माण झाला. अखेर अर्ध्या तासानंतर या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आले. मात्र मतदानातचा १ तासाहून अधिकचा वेळ वाया गेल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आता उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झाले. दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले. पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परभणीत उबाठा खासदार संजय जाधव यांनी कुटुंबासह मतदान केले. त्यांनी सांगितले, “आज पर्यंत अनेक निवडणुका झाल्या मात्र महानगरपालिकेची अशी निवडणूक कधीही बघितली नाही. भाजप कडून एका मताला पाच ते दहा हजार रुपये वाटप केले जात असल्याचा आरोप आहे. भाजपकडून या निवडणुकीत पैशांचा मारा केला जात आहे कारण त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही. मुंबईमध्येही शिवसेनेचा आज महापौर होईल.”
विरोधकांकडून निवडणुकीतील गैरप्रकारांबद्दलही आक्षेप घेतले जात आहेत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांचा आरोप आहे. जालगाव महापालिकेच्या मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शीतल पाटील यांनी पोलिसांवर आरोप लावला की, उमेदवार मतदान केंद्रा बाहेर उभे राहून प्रचार करत असतानाही पोलीस पात्र बघायची भूमिका घेत आहेत.
पुण्यातील प्रभाग २४ मध्ये मशीन बंद पडल्याने मतदार संतापले. मतदान केंद्र क्रमांक तीन मधील खोली बंद पडल्याने काँग्रेसचे उमेदवार शर्मा राहुल संतापले. ईव्हीएम मशीन जेव्हा सुरू होईल तेव्हा वेळ वाढवून देण्याची मागणी काँग्रेसच्या उमेदवारांनी केली आहे.
संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातल्या महाराणा प्रताप शाळेतील बुथवर मशीन मध्ये बिघाड झाला. घरातील दुसऱ्या केंद्रावरील मशीन मधली बिघाड झाली.
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड आहे. ४, ५, १०, ११ या प्रभागांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आहे. तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद पडली. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद झाली. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रात मतदानाला सुरुवातच नाही. EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धातपासून मतदान नाही. अद्याप या केंद्रावर एक ही मतदान झालेले नाही. निवडणुक कर्मचाऱ्याकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र सकाळी मतदाणासाठी आलेले नागरिक ताटकळत उभे आहेत.
सांगलीच्या मिरजेमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार समोर आला. शहरातल्या प्रभात पाच मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते. सुमारे १ तास या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली होती. शहरातील जवाहरचौक येथील २६ नंबर मतदान केंद्रावरतीन मतदान झाल्यानंतर चौथे मतदान करताना मशीन बंद पडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली, अखेर अर्ध्या तासानंतर या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आले, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे. मात्र मतदानातचा १ तासाहून अधिकचा वेळ वाया गेल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आता उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
संभाजीनगर मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ उडाला आहे. संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटन काम करत नसल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. मतदारांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागल्या आहेत. आम्ही किती वेळ रांगेत उभे राहायचे असा प्रश्न मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील मतदान केंद्र क्रमांक १५ मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. दरम्यान एमआयएम चे उमेदवार काकासाहेब काकडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान केंद्रात जाऊन जा विचारला आहे.
अकोल्यातल्या एका मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. वादांचं रूपांतर किरकोळ हाणामारीमध्ये झालंये. अकोला महापालिकेतील प्रभाग १७ मधील भांडपुरा चौकातल्या महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे. या मतदान केंद्रावर लोकांची मोठी गर्दी. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अर्थातच पोलिसांच्या हस्तक्षेपांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर जमलेली गर्दी पांगवली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे.
नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला. महापालिकाच्या शाळेतील मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड. मतदान यंत्रात बिघाड झाल्यान मतदान प्रक्रिया रखडली.
विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी म्हटले, “पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा.”
मतदानाच्या ओळखपत्रासाठी १२ पैकी १ पर्याय मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार. शहर निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहितीखाली दिलेल्या १२ ओळखपत्रे धरले जाणार. यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, मनरेगाअंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे पर्याय आहेत.
२९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला उत्साह आहे. प्रत्येक शहरातून मतदारांचे प्रवाह सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मतदान प्रक्रिया खोळंबली आहे, तर काही ठिकाणी शांततेने मतदान होत आहे. राजकीय पक्षांचे नेते आपल्या मताचा वापर करून जनतेला मतदानासाठी प्रेरित करत आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील आणि नंतर मतगणना होईल.