महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर अनेक ठिकाणी राजकीय गुंतागुंतीत परिस्थिती त्रिशंकू आहे. अमरावती महानगरपालिकेत महिलाराज आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. इतर शहरांच्या अपडेट्स पहा.
आज सकाळी ५ च्या सुमारास खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याची चाचणी सुरू झाली. पुणे-सातारा वाहतुकीसाठी हा बोगदा उपयुक्त ठरणार आहे. दुहेरी मार्गाच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.
अहमदपूर-अहिल्यानगर मार्गावर पोलीस व्हॅनचा अपघात झाला. बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा बॅंकेचे संचालक केज न्यायालयाकडे नेत असताना व्हॅन आणि दुचाकी यांची येळंब घाट परिसरात धडक झाली. व्हॅन आऊट साईडने चालत असल्याने भीषण अपघात झाला, ज्यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले.
अमरावती महानगरपालिकेच्या २२ प्रभागातील ८७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४५ महिला नगरसेविका निवडून आल्या. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे संख्याबळ जास्त असल्याने अमरावती महानगरपालिकेत महिलाराज आले आहे. ४२ पुरुष नगरसेवक निवडून आले आहेत.
नागपूरात २१ जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० सामना खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट टीम पालकांच्या व्हिसीए स्टेडियमवर पोहचली आहे. वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांसह अनेक खेळाडूंची उपस्थिती आहे.
तुमसरातील शिवाजीनगर परिसरात ओसाड बीएसएनएल सदनिकांना भीषण आग लागली. मागील १५-२० वर्षांपासून वापराविना असलेल्या इमारतींच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आणि झुडपे वाढली होती, ज्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
धाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. कार्यालयाकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. पंचायत समितीच्या ११० जागांसाठी ३९२ इच्छुकांनी तर जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी ३२० इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि चार आमदारांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली.
भाजप नेते राज के. पुरोहित यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मतदानाच्या दिवशी धांदल उडाल्याची टीका केली आहे. अनेक ठिकाणी मतदारसंघ मतदारांचे वेळेवर बदलल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे एकूण ८० जागा आहेत. सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेत. भाजपाचे बंडखोर आशिष पवित्रकार म्हणत आहेत, ‘ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है’.
अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारीसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस. सन २०२४ च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांच्या भाषणात मतदारांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भिलेवाडा येथील कबड्डी स्पर्धेत भाग घेतला. उद्घाटनाच्या वेळी खासदारांना कबड्डीचा मोह आवरला नाही त्यांनी स्वतः मैदानात उतरून आनंद घेतला.
खडकवासला धरणात एका महिलेचे प्राण बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले. महिला पाण्यात उडी मारत असताना हरिदास पुंडलिक वऱ्हाड यांनी पाण्यात उडी घेतली व तिला बाहेर काढले. नंतर पोलिसांच्या मदतीने तिला पतीच्या स्वाधीन करण्यात आले.
उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगली गर्दी झाली आहे. या बैठकीत निवडणूक तयारी, पक्ष संघटन बळकटी, बूथनिहाय नियोजन याबाबत विस्तरून चर्चा करण्यात आली.
सोलापूर महापालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू झाली आहे. ‘सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली, पार्टी जिंकली’ अशा आशयचे बॅनर दिसत आहेत. आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
हिंगोलीत वाळू माफियांनी राज्य महामार्गावर हौदोस घातला आहे. डंपर चालकाने रस्त्यावर वाळू सांडून पळ काढले, ज्यामुळे अनेक दुचाकी चालकांचे अपघात घडले. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेत सांडलेली वाळू बाजूला केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात मतांनी पराभूत झालेले १४ भाजप उमेदवार यांना सन्मान दिला जाईल, अशी भूमिका माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केली. योग्य वेळेला त्यांचा पुनर्वसन केला जाईल.
नवी मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटाचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. या ठिकाणी खासदार नरेश मस्के पराभूत झालेले उमेदवारांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. शासकीय रुग्णालयात दररोज आठ ते दहा रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. पालिका प्रशासन बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून अभिनंदन केले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे गणेश नाईक यांच्या कार्याचे स्वागत केले गेले.