महाराष्ट्रातील चुनावी रंगत: समृद्धी महामार्गावर मोठी ट्रॅफिक सूचना, पुण्यात अजित-सुप्रियांची संयुक्त सभा

आदित्य कदम
8 Min Read

महाराष्ट्रात आता निवडणूकीचा रंग जास्त होतो आहे. एकीकडे पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची संयुक्त सभा भरणार आहे, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक बदलणार आहे. त्यामुळे प्रवासाचे प्लानिंग आधीच करणे गरजेचे ठरेल.

समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक व्यत्यय राहील. राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ‘गँट्री’ (लोखंडी सांगाडे) बसवण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी दररोज ४५ मिनिटे ते १ तास वाहतूक थांबवली जाणार. काही वेळ पूर्णपणे बंद, तर काही वेळ संथ गतीने वाहतूक सुरू राहील. नागपूर–मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना फटकाएकूण १० टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत काम चालेल. समृद्धी महामार्गावरील ९०+५०० ते १५०+३०० किमीचा टप्पा प्रभावित राहील. त्यामुळे प्रवासाचे वेळापत्रक आधीच ठरवण्याचे आवाहन केले जात आहे. पर्यायी मार्ग किंवा अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

पुण्यात उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची संयुक्त सभा उद्या पुण्यात भरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या जाहीरनामा होणार प्रसिद्ध आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणानंतर भाऊ बहीण पहिल्यांदाच एकत्र मंचावर दिसणार आहेत. सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित होणार आहे.

विश्वजीत कदम यांनी भाजपावर टीका केली आहे. एमआयएम युतीमुळे भाजपाचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या अकोला येथील भाजपचे आमदार नेते ऐकत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अकोल्याचा अकोट महानगरपालिकेत भाजपा आणि एमआयएमने केलेल्या युतीवरून ही टीका झाली.

कोरेगाव-भीमा हिंसाचाराची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातच उद्धव ठाकरे यांचे आयोगात प्रतिज्ञापत्र सादर आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आता मुख्यमंत्री पदावर नसल्यामुळे प्रकश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. असीम सरोदे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

देवळाली कॅम्प येथील कॅथे कॉलनीत पोलिसांचा छापा झाला आहे. येथून ४८७ ग्रॅम अँम्फेटामाइन ड्रग्ज पावडर जप्त झाला आहे. जप्त ड्रग्जची अंदाजे किंमत २३ ते २४ लाख रुपये आहे. अमली पदार्थ विक्रीच्या संशयातून पितापुत्रासह तिघांना अटक मिळाली आहे. मिलिटरी गेटसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज साठा आढळला. फॉरेन्सिक तपासणीत पांढरी पावडर ‘अँम्फेटामाइन’ असल्याची पुष्टी झाली. लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई झाली. आरोपींच मागील दोन वर्षांपासून लष्करी हद्दीजवळ वास्तव्य असल्याची माहिती आहे. पोलिस तपास सुरू आहे. एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत, कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी तुळजापुरातील पुजाऱ्यांनी केली आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात तुळजापुरातील पुजारी आक्रमक झालेत. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांना निवेदन दिले. दोन दिवसांपूर्वी जिल्हापरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यानंतर तानाजी सावंत यांनी तुळजापूरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला. आता मातेचा प्रसादा देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल अस वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच पुजारी आक्रमक झालेत. जाहीर सभेत तानाजी सावंतांनी तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या पवित्रतेवरही संशय निर्माण केला म्हणत पुजाऱ्यांनी ही मागणी केली. तानाजी सावंत यांनी चूक मान्य करत जाहीर माफी मागावी, अशीही मागणी आहे.

राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात आहे. पुणे शहराचा पारा ९.५ अंशावर आहे. विश्रांती घेतलेल्या थंडीने राज्यात पुन्हा एन्ट्री घेतली आहे. पुण्या पाठोपाठ विदर्भात सुद्धा पारा घसरला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात घट झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आहेत. कात्रज चौकातून एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे. दुपारी नाना पेठेत जाहीर सभा आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ही एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आहे. पुण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे शिंदे सभेतून काय बोलणार, याकडे लक्ष आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या उमेदवारा करता समीर बागवान आणि विशाल विचारे यांच्या प्रचाराकरता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्ला चढावला आहे. महाराष्ट्रातील निवडणुका आता निपक्षपाती राहत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर राज्यात ६८ सत्ताधारी उमेदवार बिनविरोध, मात्र विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध नाही, ही काय जादू? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुका संपवून टाकण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला असून, पैसा आणि दमदाटीच्या जोरावर मते मिळवली जात आहेत, असे ते म्हणाले. ऑन कॅमेरा पैशांच्या बॅगा भरलेल्या दिसत आहेत, मग नोटबंदीनंतर इतक्या नोटा येतात कुठून? असा थेट प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना केला. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने निवडणुका लढवत आहोत. सर्वसामान्य जनता जेव्हा उठेल, तेव्हा ही भ्रष्ट सत्ता उलथून पडेल, असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला.

१४ आणि १५ जानेवारीला मनपाची शहर बस सेवा ‘आपली बस’ बंद राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद राहील असे म्हटले जात आहे. निवडणुकीसाठी ३००४ बूथ वर १४ जानेवारीला कर्मचारी आणि मतदान साहित्य पोहचविण्यासाठी या बसेस वापरण्यात येणार. मतदानाच्या दिवशीही मनपा च्या ५०० बसेस वापरण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र मनपा आयुक्तांकडून या प्रस्तावाला अजून मंजुरी मिळायची आहे.

महापालिकेच्या प्रचारासाठी पुण्यातून दररोज १२ हेलिकॉप्टरचे उड्डाण होत आहे. राज्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने महत्त्वाच्या नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर वाढला आहे. एका दिवसात दोन ते तीन ठिकाणच्या सभेला उपस्थिती लावायची असल्याने अनेक नेत्यांकडून हेलिकॉप्टरला प्राधान्य आहे. पुण्याहून सर्वाधिक वापर मुंबईला जाण्यासाठी होत आहे. मुंबई पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी देखील हेलिकॉप्टरचा वापर होत आहे.

गेल्या महिन्याभरात रत्नागिरी RTO कडून कडक कारवाई सुरु आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जोरदार मोहीम चालू आहे. गेल्या महिनाभरात २५५ वाहनांची तपासणी केली गेली. यात ११ वाहने दोषी आढळल्या. त्यांच्याकडून १० हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या वाहन चालकांचा परवाना १८० दिवसांसाठी निलंबित करण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित आहे. उप प्रादेशिक परिवहन तपासणी मोहीम यापुढेही अधिकारी राजवर्धन करपे यांनी हा इशारा दिला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ४०११ मतदान केंद्र महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी असणार. १३,८८२ मतदान यंत्र द्वारे १५ ठिकाणी मतमोजणी होणार. बाबुराव सणस मैदान, शरदचंद्र पवार अकॅडमी, टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी यासह पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार.

बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध लादल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बांगलादेशाने भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर निर्बंध लावला आहे. कांदा आयातीसाठी नव्याने परवाने देणं केलं बंद. आधी मंजूर केलेल्या आयात परवान्यावरील कांदा आयात ३० जानेवारीपर्यंतच सुरू राहणार. बांगलादेशाने कांदा आयातीवर निर्बंध लादल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापार अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकट्या नाशिकमधून दररोज तब्बल १,५०० टन कांद्याची बांगलादेशात होते निर्यात. कांद्याची कोट्यावधींची उलाढाल ठप्प होण्याची भीती आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *