महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचे रणक्षेत्र तयार झाले आहे. २४ जानेवारी २०२६ रोजीच्या ताज्या राजकीय बातम्यांमध्ये एकाच दिवशी निवडणुकींशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडी सामील झाल्या आहेत. सोलापुरात शिवसेना एकत्र आली असून धाराशिव जिल्ह्यात ‘यशवंत सेना’ हा नवा पर्याय उमटला आहे. दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी पूर्ण तयारी घेतली आहे.
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. या एकत्रीकरणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत. एकीकडे संजय राऊंतांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापि जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत ‘यशवंत सेना’ नावाच्या रूपाने एक नवीन राजकीय पॅटर्न समोर आला आहे. शिवसैनिक व इतर पक्षातील ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी ‘यशवंत सेनेचा’ मार्ग निवडला आहे. धाराशिव, तुळजापूर व कळंब या ३ तालुक्यात अनेक इच्छुकांनी हा मार्ग स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यशवंत सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजू भाऊ पटेल यांच्या हस्ते हा मार्ग घेतला जात असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर शिवसेना समावेश असून भाजपच्या बंडखोरांनी देखील यशवंत सेनेचा पर्याय निवडला आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेत फूट पडल्याने महायुतीची घोषणा झालेली नाही तर महाविकास आघाडीमध्येही सगळं काही अलबेल नसल्याने बंडखोरीला मोठे ग्रहण आले आहे. त्यातच यशवंत सेनेचा हा नवा धाराशिव पॅटर्न जिल्हा परिषद उमेदवारी समोर आला असून याला कितीपत यश मिळते याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६०५ मतदान केंद्र तर १४ हजारांहून अधिक मतदान यंत्रे असणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नगरपरिषदा व महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या चुका जिल्हा प्रशासन टाळणार असून याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये वारंवार ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या आल्या होत्या तक्रारी ईव्हीएम मशिन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या रांगा याच चुका जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशासन टाळणार असून ईव्हीएम मशिन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
पुणे रेल्वे विभागातील अनेक रेल्वे गाड्या आज आणि उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे विभागाच्या दौंड काष्टी स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या नोंद इंटरलॉकिंगच्या कामाकरिता दोन दिवसांचा ब्लॉग घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ व २५ जानेवारीला धावणाऱ्या तब्बल २६ एक्सप्रेस तर बारा डेमू रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. पुणे सोलापूर व पुणे भुसावळ मार्गावरील सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
रत्नागिरीतल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात शिंदे शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील का ठेवलं हा आपल्यापुढे प्रश्न असून, फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही. त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. असं असलं तरी जनमताचा कौल घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं परशुराम कदम यांनी स्पष्ट केलं आहे. २१ तारखेपासून अनेकांचे फोन आले, केलेल्या कार्याला अनेक जण पाठींबा देत असल्याचं देखील कदम यांनी म्हटलं आहे.
पुणे सायकल टूरमध्ये दुपारी डेक्कन भागात सायकल पट्टूंचा अपघात घडला आहे. अपघातनंतर सायकल पटूमध्येच वादावादी झाली. काही सायकलपटू आणि पोलिसांनी हा वाद मिटवला आणि पुन्हा स्पर्धा सुरु झाली. दुपारी डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छाननी अंती जिल्हा परिषदेसाठी ३६१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत तर पंचायत समितीसाठी ६५६ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुण्यात डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड झाली आहे. डेटिंग अॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लूटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिल अकील शेख, नुहान नईम शेख, शाहिद शाहनूर मोमीन, इशान निसार शेख आणि वाहिद दस्तगीर शेख अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर मयताच्या पत्नीसह नातेवाईकानी ठिय्या केला. गुन्हा दाखल केल्याशिवाय उठणार नाही अशा पवित्रा घेतली आहे. सुसाईड नोटमध्ये जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासन हेतू पुरस्कार या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेत नाही. गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे केसनंद पंचायत समिती गटातुन कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातुन भाजपाची मोठी ताकद वाढली आहे. यापूर्वी या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती मात्र कुशाल सातव केसनंद परिसरात भाजपात प्रवेश केल्याने मोठी ताकद वाढली असून राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दोन कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी शिरूर येथे एका गॅरेज चालक शादब रियाज यास दोन कोटी दहा लाख रुपयांचा १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) सह पकडले होते. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रग्स अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याकडून त्याने घेतले होते अशी प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. मात्र आता या प्रकरणात अनेक धकादायक खुलासे होत असून अहिल्यानगर पोलिसांनी हे एमडी ड्रग्स हे श्रीरामपूर येथे छापा टाकून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केले होते.