नववर्षाच्या स्वागतासाठी मेट्रो १ रात्री २.४५ पर्यंत धावेल; २८ विशेष फेऱ्या वाढविल्या
मुंबई: नववर्षाच्या सणासाठी मुंबईत जाणाऱ्या नागरिकांसाठी मोठी सोय झाली आहे. ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत मेट्रो १ च्या सेवा उपलब्ध राहणार आहे. यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी ‘मेट्रो १’ मार्गिकेवर २८ विशेष फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ५०४ पर्यंत पोहोचेल. या मार्गिकेवरील शेवटची गाडी रात्री २.४० वाजता घाटकोपरकडून आणि २.१४ वाजता वर्सोवाकडून सुटणार असल्याची माहिती एमएमओपीएलने दिली.
नववर्षाच्या पार्टीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना ट्राफिकची चिंता नये आणि ते इच्छितस्थळी वेळेवर पोहचू शकतील यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही अतिरिक्त सोय ठरेल.
बातमी वाचा: मुंबई: ॲप डाऊनलोड करून रद्द झालेल्या ट्रेनची माहिती तात्काळ मिळवा
मेट्रो १ च्या नियमित फेऱ्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी दर ३ मिनिट २० सेकंदांनी आणि गर्दी नसताना दर ५ मिनिट ५५ सेकंदांनी मेट्रो सेवा उपलब्ध राहील. रात्री १२ नंतर दर १२ मिनिटांनी गाड्या धावणार असल्याचाही त्यांचकडून सांगितले गेले आहे.
मेट्रोसोबत लोकल आणि बेस्ट बसच्या विशेष फेऱ्यांचीही माहिती आहे. त्यांच्यामुळे नागरिकांना अडचण येणार नाही. दुसरीकडे, आरे-कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिका दिवस-रात्र धावणार आहे. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.