प्रियदर्शनजाधव आणि विशाखा सुभेदार यांची जोडी पुन्हा कल्ला करणार; शांतेचं कार्टं चालू आहे पुन्हा रंगभूमीवर अवतरणार
मुंबई: प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदार यांची जोडी पुन्हा कल्ला करणार. हे नाटक ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार आहे. हे नाटक काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होणार आहे.
शांतेचं कार्टं चालू आहे हे नाटक, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहात असे, पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.
दिग्दर्शन विजय केंकरे यांनी, लेखन श्रीनिवास भणगे यांनी हे नाटक तयार केले आहे. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणले आहे. हे नाटक प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
हे नाटक कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, ”रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक ”प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.’एकूणच, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हाशॉपिंगसाठी ‘सकाळ प्राईम डील्स’च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
मराठी बातम्या आणि लिव टीव्ही पाहू. महाराष्ट्र, भारत, पुणे, मुंबई, राजकीय, मनोरंजन, क्रीडा, जीवनशैलीच्या ताजी बातम्या साम टीव्हीवर. मोबाईलवर मराठी बातम्या पाहू. साम टीव्ही एप ऐपल आणि इंडिया ऑनलाइनवर साठवा.