पुणे मनपा निवडणूक: अजित-शरद पवारांचं फॉर्म्युला ठरलं! घड्याळ आणि तुतारी सोबत लढणार

आदित्य कदम
1 Min Read

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समझोता झाला आहे. अखेरच्या दिवशी पुण्यात अजित पवार आणि शरद पवार गटाने जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला. यानुसार पुण्यात अजित पवारांच्या गटाला ११० जागा आणि शरद पवार गटाला ५० जागा मिळाल्या आहेत. बाकीच्या ५ जागा इतर पक्षांसाठी साठी ठेवण्यात आल्या आहेत.

दोन्ही गटांमधील नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गुप्त बैठका सुरू होत्या. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर यावर एकमत पोहोचले गेले. याबद्दल माहिती अजित पवार गटाचे राज्य प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिली.

समझोत्यानुसार दोन्ही गट आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. अजित पवारांचा गट ‘घड्याळ’ आणि शरद पवारांचा गट ‘तुतारी’ या चिन्हांवर उमेदवार उभे करणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये ज्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील, त्या चिन्हाचा वापर केला जाईल. उदाहरणार्थ, एखाद्या प्रभागात जर अजित गटाचे तीन आणि शरद गटाचा एक उमेदवार असेल, तर सामान्यपणे सर्वजण ‘घड्याळ’ चिन्हावर लढतील. तर जिथे दोन्ही गटांचे दोन्ही उमेदवार आहेत, तिथे दोन्ही चिन्हे वापरली जातील.

या समझोत्यामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का लागल्याचे मानले जात आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड निवडणुकीनंतर आता पुण्यातही ‘काका-पुतणे’ एकत्र आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळवडे येथून प्रचाराचा नारळ फोडताना शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती, जी आता फॉर्म्युल्यात रूपांतरित झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *