संजय लीला भन्साळी यांच्या ६३व्या वाढदिवशी हार्ट अटॅक? – रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?
संजय लीला भन्साळी यांच्या ६३व्या वाढदिवशी सोशल मीडियावर अफवा पसरली. ती अफवा म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आला असे दावले. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची चर्चा जोरात सुरू झाली. पण या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि आधारहीन असल्याचे स्पष्ट झालं आहे.
भन्साळी यांच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, “संजय लीला भन्साळी यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. कृपया अशा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नका.” या स्पष्टीकरणानंतर अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
अफवा ‘मामाराजी’ नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून सुरू झाली. त्या पोस्टमध्ये भन्साळी यांना वाढदिवशी हार्ट अटॅक आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही म्हटले गेले. पण या पोस्टला कोणताही अधिकृत पुरावा नव्हता.
भन्साळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेली वेब सिरीज Heeramandi प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहीली आहे. आता ते ‘लव्ह अँड वॉर’ या नव्या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबिर कपूर आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
एकूणच, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या संजय लीला भन्साळी पूर्णपणे निरोगी असून त्यांच्या आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहेत.