मकर संक्रांती 2025: काळ्या साडीत राजकीय छटा! ट्रेंडिंगमध्ये ५ विशेष पर्याय

आदित्य कदम
2 Min Read

मकर संक्रांतीच्या तयारी सुरू झाल्या आहेत. या वर्षी साडीत काळा रंग प्रमुख ट्रेंडमध्ये आहे. काळी साडी (Black Saree) नेसल्यास मिळणारा राजकीय छटा आणि वेगळेपणा अनेकांच्या आवडीचा आहे. पारंपरिक लूकसाठी काळ्या साडीतील हे ५ ट्रेंडिंग पर्याय तुम्हाला मदत करतील.

पारंपरिक लूकसाठी काळी पैठणी साडी खूपच लोकप्रिय आहे. सोन्याची जर, मोराची नक्षी आणि रेशमी काठ सणाला शोभून दिसतो. ही साडी पारंपरिकतेचा अनुभव देते. रॉयल लूकसाठी ब्लॅक बनारसी साडी एक बेस्ट पर्याय आहे. जड ब्रोकेड डिझाइन आणि गोल्डन वर्क असलेली साडी संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट दिसते.

घालण्यास हलकी असल्यामुळे ब्लॅक कॉटन साडी दिवसभर घालण्यासाठी योग्य आहे. रंगीबेरंगी ब्लाऊजसोबत तुम्ही साडी नेसू शकता. मात्र, ब्लॅक सिल्क साडीमुळे सणासुदीला एलिगंट आणि क्लासी लूक येतो. गोल्डन बॉर्डर संक्रांतीला खास शोभा आणते. तरुणींमध्ये ब्लॅक प्रिंटेड साडी खूप ट्रेंडिंग आहे. फ्लोरल किंवा ट्रेडिशनल प्रिंट असलेल्या साडीवर ऑक्साईडचे हलके दागिने घातले तर लूक उठून दिसतो.

चंदेरी फॅब्रिकमुळे साडीला हलकी चमक मिळते. ब्लॅक चंदेरी हे कॉमबिनेशन सुंदर दिसते. हि साडी तुम्ही संक्रांतीच्या पूजेसाठी आणि हळदी-कुंकूसाठी नेसू शकता. वारली पेटिंग आधारित टेम्पल बॉर्डर असलेली ब्लॅक साडी पारंपरिक सणासाठी खास मानली जाते. ब्लॅक रंगातील माहेश्वरी साडी संक्रातीला एकदम उठून दिसते. या साडीवर तुम्ही वेगवेगळे दागिने घालू शकता.

ब्लॅक साडीवर तुम्ही वेगवेगळे रंगीत ब्लाऊज, हिरव्या किंवा मॅचिंग बांगड्या, नथ आणि गजरा वापरल्यास मकर संक्रांतीचा ट्रेडिशनल लूक अधिक छान दिलण्यास मदत होईल.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *