इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल; ट्रम्पांची जगाला धमकी

आदित्य कदम
1 Min Read

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांसाठी मोठी धमकी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर कोणताही देश इराणसोबत व्यापारी संबंध ठेवले, तर त्यांना अमेरिकेसोबत होणाऱ्या सर्व व्यापारांवर २५ टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल.

ट्रम्प यांनी ही घोषणा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केली. तेथे त्यांनी लिहिले, “इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही.” या निर्णयाचा परिणाम चीन, ब्राझील, तुर्की आणि रशिया सारख्या देशांवर थेट होऊ शकतो, कारण या देशांचे इराणशी मजबूत व्यापारी संबंध आहेत.

भारताच्या बाबतीत अद्याप अमेरिकेकडून कुठलाही विशिष्ट आढावा केलेला नाही, परंतु भारत इराणकडून साखर, चहा, औषधे आणि सूखा मेवा यांसारख्या वस्तू आयात करतो. त्यामुळे भविष्यात या परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, अमेरिकेचे व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, संवादाद्वारे प्रश्न सोडवणे हे अमेरिकेचे प्राधान्य आहे. मात्र, लष्करी कारवाई हा पर्याय असून तो अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत उघडा ठेवला जाईल. ट्रम्प यांनी निदर्शकांच्या मृत्यूंसंदर्भातही नाराजी व्यक्त केली होती आणि इराण सरकारवर दबाव वाढवण्यासाठी लष्करी कारवाईची धमकीही दिली होती. इराणकडून अमेरिकेला मिळणारा संदेश स्पष्ट नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *