EVM चा फायदा फक्त ठराविक पक्षांनाच? महायुतीच्या आमदारानेच उचलला मोठा प्रश्न

आदित्य कदम
3 Min Read

महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक निकालांनी राजकारण गरम केले आहे. विशेषतः ठराविक पक्षांच्या निराशेत आता नवीन चर्चा सुरू झाली आहे. EVM चा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? अशा प्रकारचा मोठा प्रश्त आता महायुतीच्या आमदारानेच उचलला आहे. महापालिका निवडणूक निकालांनंतर महायुतीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. भाजपने त्येथे मोठे यश मिळवले. याच परिणामाने आमदार मिटकरी नाराज झाले आहेत. त्यांनी ईव्हीएमवर शंका उचलली आहे.

महापालिका निकालांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. या ठिकाणी भाजप ही स्वतंत्र निवडणूक लढवत होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध अजित पवारांची लढत होती. मात्र भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीला घरचा रस्ता दाखवला. छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने झाल्याने परिणामात मोठा वळण आले. पराभवावरून आमदारांनी डिवचलंत अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अहिल्यानगर वगळता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचं मोठं पानीपत झाल्याचे आमदार मिटकरी म्हणत आहेत. पराभवानंतर त्यांनी आता मोठी मागणी केली आहे. राज्यातील यापुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला आपल्यावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर हा निर्णय घ्यावा लगणार असल्याचं ते म्हणतात. ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? असा सवाल त्यांनी केला आहे.

महापालिका निवडणूक निकालानंतर फडणवीस सरकारचे निर्णय देखील चर्चेत आहेत. पोलिसांना सरकारी घरं, अटल सेतूवर टोल फ्री अशा निर्णयांवर आज चर्चा सुरू आहे. आमदार मिटकरींनी ‘बॅलेट’वर मतदान घेण्याची मागणी करत विरोधकांच्या सुरात सुर मिळवला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करूनही आमच्या पक्षाचा पराभव कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय गर्मी आता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणालेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील असं ते म्हणालेत. दरम्यान, कुटुंब म्हणून पवार कुटुंबिय हे कायमच एक असल्याचं ते म्हणालेत. ईव्हीएम चा फायदा काही ठराविक पक्षांनाच होतो असा आरोप आता महायुतीतून आवाजावर येत असल्याने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हे चर्चेत आले आहे. राजकारणात नवीन वाद आता तीव्र होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *