Bigg Boss Marathi 6 नंतर राकेश बापट चर्चेत; रिधीबद्दल काय म्हणाला?

आदित्य कदम
1 Min Read

‘बिग बॉस मराठी 6’चा प्रवास संपल्यानंतर अभिनेता राकेश बापट पुन्हा चर्चेत आला आहे. या सिझनमध्ये तो उपविजेता ठरला, तर विजेतेपद तन्वी कोलतेने जिंकलं.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राकेशने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोललं. विशेष म्हणजे त्याने त्याची पूर्व पत्नी रिधी डोग्रा हिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

राकेश म्हणाला की, घराबाहेर आल्यानंतर त्याचं रिधीशी बोलणं झालं. तिने त्याच्या खेळाचं कौतुक केलं. तो शोमध्ये जसा आहे तसाच राहिला, हे तिला आवडलं.

तो पुढे म्हणाला की, “आमच्या आयुष्यात काहीही झालं तरी तिची जागा कायम राहणार आहे. ते कधीच बदलणार नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

राकेश आणि रिधी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, आठ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तरीही दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे.

राकेश बिग बॉसच्या घरात असताना रिधीने सोशल मीडियावरून त्याला पाठिंबा दिला होता. तिने त्याच्या खेळाचं कौतुक करत तो स्वतःच्या नियमांनुसार खेळतोय, असं म्हटलं होतं.

रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एखादी अडचण आली तर ती आजही राकेशकडून मदत घेते. तिच्या मते, तो फक्त पूर्व पती नाही तर तिचा जवळचा मित्र आहे.

या दोघांचं नातं घटस्फोटानंतरही चांगलं राहिल्यामुळे चाहत्यांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *