महाराष्ट्रातील आजच्या मुख्य बातम्या: शिवसेनेचे एकत्रित अभिवादन, निवडणूक स्पर्धा आणि अपघातांचे तीव्र दुखापत

आदित्य कदम
17 Min Read

महाराष्ट्रातील आजच्या मुख्य बातम्या: शिवसेनेचे एकत्रित अभिवादन, निवडणूक स्पर्धा आणि अपघातांचे तीव्र दुखापत

महाराष्ट्रातील राजधानी आणि जिल्हास्तरीय अनेक घडामोडींमुळे आज दिवस भर चळवळ राहिला. मुंबईतील वडाळा परिसरात अर्बन कंपनीच्या थेरपिस्टकडून एक महिलेवर हाणामारीचा आरोप आहे, तर यवतमाळमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. उभी राहिलेली कृषी प्रदर्शने आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार देखील तीव्र आहे. आजच्या राज्यातील ठळक घडामोडींवर एक नजर.

मुंबईतील वडाळा भागात अर्बन कंपनीच्या मसाज थेरपिस्टकडून एका महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आहे. बुकिंग रद्द केल्यावर थेरपिस्ट संतापली आणि शिवीगाळ करत हातापाई केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

बारामतीत कृषी प्रदर्शनाचा आज पाचवा दिवस आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने हे प्रदर्शन १७ ते २४ जानेवारी दरम्यान सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्याचे ठराविक ठरवले आहे.

यवतमाळमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले होते. गटबाजीचे प्रदर्शन टाळून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

बीडच्या परळी नगर परिषदेच्या प्रशासनाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे दिसून आले आणि याचमुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली. नगरपरिषदेचे उपमुख्याधिकाऱ्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

कणकवली पंचायत समितीत वरवडे मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर सावंत व मनसेचे शांताराम साद्ये या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने सोनू सावंत बिनविरोध विजयी झाले. वरवडे हे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे गाव असून या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडले जाणे ठाकरे सेनेला धक्का बसला आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड दुचाकीवरून शेतशिवारात पोहोचले होते. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनियमितता होत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षरीत्या योजनेच्या कामाची पाहणी केली.

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची श्रीरामपूरात अवैध गॅस रिफीलिंग विरोधात कारवाई झाली. वाहनामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस रिफीलिंग करणारे दोघे ताब्यात आले. एच.पी आणि भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरच्या १४ गॅस टाक्यांसह १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. सलमान पठाण आणि लुकमान पठाण यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

राहाता तालुक्यातील पिंपळस गावात बिबट्यांचा मुक्त संचार आढळला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न फसल्याचे दिसले.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला. भ्रष्टाचार निवारण विभागानंतर आता प्रवर्तन निदेशालयाच्या केसमध्ये निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

बदलापूर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आला. २७ जानेवारी पर्यंत ३ दिवसांची पोलीस कस्टडी न्यायाधीश पत्रावळे यांच्या दालनात सुनावणी चालली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागे उभे असलेल्या एका कारमध्ये अडीच लाख रुपये आढळून आले. MH 12 FF 6214 क्रमांकाच्या पांढऱ्या स्विफ्ट कारमध्ये ही रोख रक्कम होती.

अहिल्यानगर महापौर निवड मुंबई स्तरावरून होणार असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. अहिल्यानगर महानगरपालिकेत ओबीसी महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकत्रित बैठक घेऊन महापौरची निवड करणार असल्याचे देखील विखे यांनी म्हटले.

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद चालू आहे. २५ जानेवारी रोजी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनावर उमेदवारांकडून तीव नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांची निवड, प्रचंड भौगोलिक अंतर, अपुऱ्या सुविधा आणि पारदर्शकतेअभावी ही परीक्षा अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्य गेटसमोर आंदोलन केले. ४२ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे, परंतु हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर अनेक उमेदवारांना घरापासून ४०० ते ५०० किलोमीटर दूर असलेली खासगी परीक्षा केंद्र दिल्याचे उघड झाले आहे.

सांगोल्यातील वाकी येथे इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या मुलीला भरधाव ट्रकक्टरने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातात नंतर येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर येवून आंदोलन केले. या ऋतुजा धनाजी कोकरे या मुलीला ट्रॅक्टरने धडक दिली. या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे, काम संत गतीने सुरू असल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत. या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावी अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

अवघ्या १५० रुपयात पार पडलं माजी आमदार कन्येचं लग्न. सोलापुरात जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणांशी नोंदणीकृत पद्धतीने झाला. शुभम शिंदे हा पाणी पुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. दोन्ही नवविवाहित वधूवर उच्च विद्या विभूषित आहेत. या लग्नाचा खर्च टाळून साधारण २५ ते ३० लाख रुपये हे विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा नवविवाहित दांपत्याने निर्णय घेतला आहे.

बदलापुरातील अत्याचार प्रकरणी आज बाल हक्क आयोगाच्या सचिवांनी पोलीस आणि शिक्षण विभागसोबत बदलापूरात येऊन आढावा बैठक घेतली. ही घटना एका प्री स्कूलमध्ये घडली असून कोणतंही प्री स्कूल शासनाच्या अखत्यारीत येत नसल्याचं बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी सांगितलं. बदलापूर शहरात १० अनधिकृत शाळा असून त्यातील तीन शाळा बंद केल्या असल्याचं गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितलंय. प्री स्कूलबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता या प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धुळे महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा महिला रज आपल्याला बघावयास मिळणार आहे, कारण धुळे महानगरपालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण महापौर पदासाठी जाहीर झाल आहे. धुळे महानगरपालिकेच्या ७४ नगरसेवकांच्या पदासाठी जवळपास ४१ महिला या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या लक्षवेधी ठरली आहे.

महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर दोन समर्थकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपींना दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीडच्या नाथापुरमध्ये रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले होते. यामध्ये एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणी दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने मोशी, उत्तमनगर, मांजरी, खडकी उपबाजार बंद राहणार आहे.

पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवड ३० किंवा ३१ जानेवारी रोजी होणार आहे. पुणे महापालिकेसाठी दहावी महिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणी खाजगी शाळा आणि खाजगी व्हॅन दोन्हींची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी संगीता चेंदवणकर यांनी केली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता सागर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडे ६६ इतके संख्याबळ झाल्या असून भाजपच्या गटनेते सागर नाईक यांची नियुक्ती झाली आहे. भाजपकडून कोकण भवन येथे गट स्थापन करण्यात येत आहे तसेच अपक्ष यांनी एक पाठिंबा भाजपला दिला आहे.

वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पंढरपूर मध्ये संपन्न झाला. आज पासून देवाची रंगपंचमी सुरू झाली आहे ती रंगपंचमी पर्यंत सुरू राहणार आहे. विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला आहे. डोक्यावरती पगडी त्यावरती मोरपंख अशा पद्धतीचा पोशाख परिधान करण्यात आला होता.

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने गटस्थापन केली. राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे १२ नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली. ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठमपा गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले.

नाशिक महापालिकेत एकीकडे भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेत मात्र संभ्रम कायम आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाकावर बसायचं? यावर अद्याप निर्णय नाही. येत्या २ ते ३ दिवसात आम्ही गट नोंदणी करणार आहोत, काही तांत्रिक मुद्द्यांमुळे गटाची नोंद करण्यासाठी झाला उशीर, अजय बोरस्ते यांची माहिती.

लातूर महानगरपालिकेतील महापौर पद हे SC एसी महिलेसाठी राखीव सोडण्यात आल आहे. महानगरपालिकेवर महापौर पदासाठी काँग्रेसकडून ३ महिला उमेदवारांची नावे समोर येताना पाहायला मिळत आहेत. कांचन अजीकर, मनीषा बसपुरे, जयश्री सोनकांबळे या महिला उमेदवारांची नावे सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. यापैकी कुणाची वर्णी महापौर पदासाठी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माळशिरस तालुक्यात भाजप आरपीआयची (आठवले गट) युती तुटली. भाजपने आरपीआयला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा न दिल्याने आरपीआय ने महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरसचे अध्यक्ष मिलिंद सरतापे यांची माहिती दिली.

नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींची आज निवड होणार असल्याने चारीपालिकेंमध्ये विशेष सभा घेतल्या जाणार आहेत. पालिका निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षची निवड झाली त्यानंतर आता विशेष समित्यांचे सभापतीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विशेष समितीच्या सभापतीची निवड झाल्यानंतर पालिकेच्या कामकाज सुरळीतपणे सुरू होणार आहे.

महाड नगर परिषद राडा प्रकरणात विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण रायगड. विकास गोगावले स्वतःहून पोलिसांसमोर हजर होणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. महाड पोलिस ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा आहे. नाशिक – खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार आहे. विराजमान – २६ वर्षानी नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी झालंय राखीव. महापौर पदाच्या खुर्चीसाठी १६ महिलांची नावे आहेत चर्चेत. हिमगौरी आडके, दिपाली गीते, संध्या कुलकर्णी, डॉक्टर योगिता हिरे आणि डॉक्टर दिपाली कुलकर्णी यांच्यामध्ये विशेष स्पर्धा. उच्च शिक्षित आणि चांगला उमेदवार महापौर पदासाठी देऊ, गिरीश महाजन यांचे देखील सुचक वक्तव्य. नाशिक महापालिकेत भाजपाला मिळालीय एकहाती सत्ता. त्यामुळे नाशिकच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार, याकडे लक्ष लागले आहे.

नाशिक – सूर्यकिरण शोसाठी तिकिट आकारणी केल्यानं हवाई दल नाराज. एअर फोर्स ने ट्विट करता नाराजी व्यक्त केली. देशभवना निर्माण करणे, युवकांना प्रेरणा देण्यासाठी वायू दल एअर शो घेत असते कोणताही शुल्क आकारले जात नाही. जमा होणारा निधी सैनिक कल्याणासाठी दिला जाणार असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा.

देशात सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांपैकी पुण्याचा दुसरा क्रमांक. टॉम टॉम या संस्थेने केलेल्या अभ्यासातून माहिती समोर आली. वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे, नव्या कारभारी यांच्यापुढे आव्हान. पुण्यात वाहनचालकांना १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात ३३ मिनि २० सेकंद, टॉम टॉम संस्थेचा अहवाल. गर्दीच्या वेळेत शहरात वाहनांचा वेग १५.१ प्रतितास असल्याचा या संस्थेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी आहे. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार. हत्या प्रकरणातील साक्षीदारांची यादी सरकारी वकील न्यायालयाकडे देणार आहेत. न्यायालयाकडून साक्षीदारांना आज नोटीस इशू होतील आणि नंतर प्रत्यक्षात साक्षीदार हजर राहतील.

सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी सुटलं आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळाले आहे पूर्ण बहुमत. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत येत्या आठवड्यात महापौर निवडी होण्याची शक्यता आहे. मनपा आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडून कॉन्सील हॉल आणि कार्यालयांची पहाणी करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन नगरसेवकांचा पुढच्या आठवड्यात शपथविधी होण्याची शक्यता आहे.

धाराशिव – ईव्हीएमच्या मुद्द्यावरून धाराशिवमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम विरोधातील उपोषणाला भेट दिल्यानंतर, रस्त्यावर जाळपोळ आणि बसची तोडफोड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा गंभीर आरोप. आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे ईव्हीएम विरोधात आमरण उपोषण सुरू. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान कडून उपोषण, उपोषणाची दखल न घेतल्याने टायर पेटवत निषेध. धाराशिव बस डेपोमध्ये दुचाकी वर येत बसची तोडफोड. धाराशिवमध्ये बस तोडफोड करणारे तीन आरोपी अटकेत; नांदेड आणि बीड जिल्ह्यातील आरोपी असल्याची माहिती.

रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या १६८ जागांसाठी ६३३ उमेदवार रिंगणात. जिल्हा परिषद साठी २०२ तर, पंचायत समिती साठी ४३१ अर्ज ठरले वैध. आता प्रतीक्षा माघारीची. तीन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात.

गृहराज्यमंत्री योगेश कदम नंदुरबार येथे ध्वजारोहण करणार. रत्नागिरी – गृहराज्यमंत्री योगेश कदम करणार नंदुरबार येथील ध्वजारोहण. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला परिपत्रक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार येथील प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान दिला योगेश कदम यांना. मंत्री झाल्यानंतर योगेश कदम प्रथमच करणार शासकीय ध्वजारोहण.

नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपानंतर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. काँग्रेसला एकूण ३४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. पक्षाकडून अनुभवी, आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवकाचा विचार केला जात आहे. विरोधी पक्षनेत्यामध्ये प्रशासनावर पकड असणे आवश्यक मानले जात आहे. या निकषांवर पक्षात अनेक नावे चर्चेत आहेत. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे. विदर्भातील ध्वनी प्रदूषणासंदर्भात न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे. विदर्भात ध्वनी प्रदूषणाची समस्या भेडसावत असल्याचं निरीक्षण नोंदवत याचिकेचा विस्तार केला. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना नोटीस बजावत दोन आठवड्यात जबाब नोंदविण्याचे दिले निर्देश. धार्मिक, सामाजिक कार्यात ध्वनीक्षकांचा मोठा वापर होत असून यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत असल्याची टीका.

जळगावच्या पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चालते फिरते नेत्रालय असलेल्या रुग्णवाहिकेच लोकार्पण. जळगाव ग्रामीण मतदार संघ मोतीबिंदू मुक्त करण्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवला संकल्प. यावेळी पाळधी सह मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील १६ ऑक्सिजन प्लांट बंद आहेत, सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च. कोरोना काळात उभारले होते हे ऑक्सिजन प्लांट; दिवसाला १३.३६ मॅट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता. ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशन आणि मनुष्यबळ न मिळाल्याने प्लांट बनले शोभेची वस्तू. पाच वर्षापासून एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला नाही.

पुण्यात फ्लेक्स कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथक तयार आहे. शहरातील अनधिकृत प्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई तीव्र करण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले जाईल. नवीन आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. अर्थसंकल्पात फ्लेक्स काढण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयात २ ते ३ कर्मचारी नियुक्त करणे, गाडीची व्यवस्था करणे यासाठी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार. शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी. भाजपने तर जाहीरनाम्यातच पुणे फ्लेक्समुक्त व अतिक्रमणमुक्त करू असे आश्वासन दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तर फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेत पद देण्यापासून दूर ठेवले जाईल असा इशारा दिला आहे.

रत्नागिरी नगरपरिषदमध्ये भाजपाचे उपनगराध्यक्ष असलेल्या समीर तिवरेकर यांना नगरपरिषदेच्या इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. नगरपरिषदेचे इंजिनियर असलेल्या यतीराज जाधव यांच्याकडून तिवरेकर यांना शिवीगाळ. नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय काळात ४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा तिवरेकर यांचा आरोप. भाजपचे उपनगराध्यक्ष असलेल्या तिवरेकर यांच्याकडून नगरपरिषदेतील शौचालय घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *