लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारखेबाबत नवी अपडेट

आदित्य कदम
2 Min Read

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नसल्याने राज्यभरातील लाखो महिला त्याची प्रतीक्षा करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरित केला जाऊ शकतो. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ ते १७ जुलैदरम्यान पात्र महिलांच्या खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाभार्थींनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा अपुष्ट माहितींवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष ठेवावे.

यापूर्वीही या योजनेचे काही हप्ते उशिराने जमा झाले होते. मे महिन्याचा हप्ता १५ जूननंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तसेच मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹३००० एकाच वेळी १७ ते २० मेदरम्यान जमा करण्यात आले होते. त्यामुळे जून महिन्याच्या हप्त्यातही काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यातील सुमारे १.७० कोटी पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पडताळणीदरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांचे हप्ते बंद करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रियाही होऊ शकते.

दरम्यान, १५ जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹३००० एकत्र जमा होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *