सोनू निगमच्या भावस्पर्शी आवाजातील ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘तिघी’ या मराठी चित्रपटातील हे गाणं आई-मुलीच्या नात्याच्या भावनिक प्रवासाला साकारतं.
भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांनी या गाण्यात नात्यांच्या नाजूक छटा उलगडल्या आहेत. या गाण्यातील शब्द जितेंद्र जोशी यांनी लिहिले तर संगीत अद्वैत नेमळेकर यांचं आहे. गाण्याच्या भावस्पर्शी रचनेमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनात घर करत आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “या गाण्यात आई-मुलींमधलं न बोललेलं प्रेम, वेदना आणि एकमेकांचा आधार दाखवला आहे. हे गाणं नात्यांमधल्या लहान पण महत्त्वाच्या क्षणांवर प्रकाश टाकतं.”
तिघी चित्रपटात तीन पिढ्यांची कथा सांगण्यात आली आहे. भारती, सोनाली आणि नेहा या तीन अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले आणि स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे.
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित या चित्रपटाकडे आत्ताच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. नात्यांच्या अनेक छटा साकारणाऱ्या या गाण्याचं संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.