70 लाख महिला अपात्र, पण पात्र महिलांना लवकरच मे हप्ता; मोठी अपडेट

आदित्य कदम
2 Min Read

राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असली, तरी काही महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही. eKYC पडताळणीनंतर अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील जवळपास १ कोटी ७० लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर सुमारे ७० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. निकष पूर्ण न झाल्याने या महिलांचा 1500 रुपयांचा मासिक लाभ बंद करण्यात आला आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे जमा झाल्यानंतर आता महिलांचं लक्ष मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचे 1500 रुपये १० जूननंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सरकारने यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेनंतर हप्ता जमा करण्याबाबत निर्णय घेतला होता. यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील हप्ता जून महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर eKYC पुन्हा सुरू होणार असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांमध्ये गर्दी केली. मात्र सरकारने हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, eKYC साठी कोणतीही नवीन मुदत देण्यात आलेली नाही. तसेच जिल्हा कार्यालयात पुन्हा कागदपत्रे जमा करण्याबाबतही कोणताही निर्णय झालेला नाही.

पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून लाभार्थींनी थेट बँक खात्यात पैसे तपासावेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *