Ladki Bahin Yojana अपडेट; मेच्या 10 तारखेपूर्वी खात्यात पैसे येणार?

आदित्य कदम
2 Min Read

राज्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता खात्यात कधी जमा होणार आणि रक्कम ₹1500 येणार की ₹3000, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि आता मे महिना सुरू होऊनही नवीन हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला. आता जवळपास 1 कोटी 89 लाख पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र प्रलंबित हप्ते एकत्र मिळणार की टप्प्याटप्प्याने, याबाबत स्पष्टता आलेली नाही.

अनेक महिलांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे पैसेही खात्यात जमा न झाल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे काही जणी स्वतःच्या पात्रतेबाबतही प्रश्न विचारत आहेत. दुसरीकडे, पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्याची शक्यता असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

काही ठिकाणी झालेल्या निवडणुकांमुळे निधी वितरणाला विलंब झाल्याचे बोलले जात आहे. मात्र आता राज्य सरकारकडून लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

आता सरकार नेमका किती हप्ता जमा करणार, याकडे राज्यभरातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *