आतड्याच्या कॅन्सरशी संबंधित तोंडातील लक्षणांना दुर्लक्ष करू नका. तोंडात दिसणाऱ्या हिरड्यांमधून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं किंवा जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर येणं ही केवळ तोंडाच्या समस्या नसून आतड्यांच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का दात किंवा हिरड्या यांच्या समस्याही काही संकेत देत असतात. तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जाऊन सूज निर्माण करू शकतात. यामुळे कॅन्सर होण्याचाही धोका निर्माण होतो. दात व्यवस्थित न घासणं, फ्लॉस न करणं, धूम्रपान, जास्त प्रमाणात दारूचं सेवन, साखरेचं अधिक प्रमाण यामुळे बॅक्टेरियाचं संतुलन बिघडू लागतं.
तोंडात आतड्यांच्या कॅन्सरचे कोणते संकेत दिसून येतात? हिरड्यांमधून रक्त येणं हे हिरड्यांच्या आजाराचं एक सामान्य लक्षण असतं. हे सूज आणि इन्फेक्शनचं लक्षण मानलं जातं. हार्वर्डच्या संशोधनानुसार, हिरड्यांचा आजार असलेल्या लोकांना मोठ्या आतड्यात कॅन्सरच्या पूर्वी दिसून येणाऱ्या गाठी होण्याचा धोका १७ ते २१ टक्क्यांनी जास्त असतो. तोंडाला दुर्गंधी येणं सतत येणारी तोंडाची दुर्गंधी हे देखील एक लक्षण असू शकतं. याचा संबंध फ्युसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम नावाच्या बॅक्टेरियाशी असतो.
हा बॅक्टेरिया हिरड्यांच्या आजारात तसंच मोठ्या आतड्याच्या कॅन्सरच्या गाठींमध्ये आढळतो. तो लाळेद्वारे किंवा रक्तपेशींद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर येणं जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर हा बॅक्टेरिया, घाण किंवा डेड सेल्स जमा झाल्यामुळे येतो. हे तोंडाच्या अस्वच्छतेचं, डिहायड्रेशनचं किंवा तोंड कोरडं पडण्याचं लक्षण देखील असू शकतं. संशोधनानुसार, काही प्रकारचे थर तोंडातील जीवाणूंमधील बदल दर्शवू शकतात.
दात पडणं हार्वर्ड आणि एएसीआरनुसार, ज्या लोकांचे चार किंवा अधिक दात पडलेत, त्यांना मोठ्या आतड्यात कॅन्सरच्या अगोदर दिसून येणाऱ्या गाठींचा धोका २० टक्क्यांनी जास्त असतो. वेळेवर उपचार न केलेल्या हिरड्यांच्या आजारामुळे असं होऊ शकतं. सकाळीचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी ‘सकाळ प्राईम डील्स’च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.