Tanvi Kolte: साखरपा आणि देवरुख परिसरात सध्या वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. ‘बिग बॉस मराठी’मधून लोकप्रिय झालेली तन्वी कोलते आता आपल्या गावात परतत असून तिच्या स्वागतासाठी मोठी तयारी सुरू आहे. तिच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या, २४ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीची सुरुवात हायवेपासून होणार आहे. त्यानंतर ती साखरप्याच्या मुख्य बाजारपेठेसह महत्त्वाच्या रस्त्यांवरून फिरणार आहे. सध्या संपूर्ण साखरपा-देवरुख भागात सजावट आणि तयारी सुरू असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने चाहते, तरुण, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
रॅलीनंतर विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमात तन्वी कोलते आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधणार आहे. ‘बिग बॉस’मधील तिचा अनुभव ती सर्वांसमोर मांडणार असून, मिळालेल्या प्रेमाबद्दल ती आभार व्यक्त करणार आहे. गावकऱ्यांमध्ये तिला प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
रॅलीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली आहे. सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
तन्वी कोलतेच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि चाहत्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.