तन्वीच्या विजयावर प्रश्नचिन्ह? सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 6 ट्रोल

आदित्य कदम
1 Min Read

‘बिग बॉस मराठी 6’चा निकाल जाहीर झाल्यानंतर तन्वी कोलते हिला विजेती घोषित करण्यात आलं. तिच्या विजयाचं अनेकांनी स्वागत केलं, पण दुसरीकडे काही प्रेक्षक मात्र या निकालावर नाराज असल्याचं दिसत आहे.

ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. तन्वी विजेती ठरली आणि मेघा धाडेनंतर ती दुसरी महिला विजेती बनली. तरीही सोशल मीडियावर या निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या सिझनमध्ये सुरुवातीपासूनच दोन गट दिसत होते. ‘टोळी’ आणि ‘काटा’ ग्रुपमध्ये सतत संघर्ष होत होता. त्यामुळे चाहत्यांमध्येही विभागणी झाली होती.

काही प्रेक्षकांनी असा दावा केला आहे की, हा निकाल आधीच ठरलेला होता. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी तन्वी जिंकणार असं सांगितल्याचाही मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे फिक्सिंगचा आरोप सोशल मीडियावर जोरात केला जात आहे.

अनेक युजर्सनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली. काहींनी तर “आता बिग बॉस पाहणं बंद” असंही लिहिलं. तर काहींनी “खरे विजेते विशाल-अनुश्री” असल्याचं म्हटलं. या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

विशाल कोटीयन आणि अनुश्री माने यांच्या चाहत्यांनी निकालावर टीका करत आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते, हे दोघेच खरे विजेते होते.

आता या वादावर संबंधित स्पर्धक काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’चे मेकर्स या टीकेला उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *