SSC HSC Result 2026 आधी बोर्डाचं मोठं पाऊल; बनावट प्रमाणपत्रांवर बसणार चाप

आदित्य कदम
2 Min Read

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी HSC SSC Result 2026 संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल आणि प्रमाणपत्राबाबत पहिल्यांदाच महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बनावट गुणपत्रिका आणि खोट्या प्रमाणपत्रांच्या प्रकारांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र दिले जात होते. मात्र आता महाराष्ट्र बोर्ड दोन्ही कागदपत्रे एकाच पानावर देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, या नव्या प्रमाणपत्रावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटोही असणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची ओळख अधिक स्पष्ट होणार आहे.

यासोबतच बोर्डाने आणखी एक मोठा बदल केला आहे. नव्या गुणपत्रिकेवर QR कोड देण्यात येणार आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक तपशील पाहता येणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी करणे अधिक सोपे होणार असून, बनावट कागदपत्र तयार करणे कठीण होईल.

बोर्डाकडून हा बदल प्रथमच करण्यात येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे. सध्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम पूर्णत्वाकडे असून, गुणपत्रिकांच्या छपाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना नवीन स्वरूपातील गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, SSC HSC Result 2026 कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर काही दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *