भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांचं नाव रणजी ट्रॉफी संघात निघाल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पण ही बातमी वाचून घाबरू नका. कारण रणजी संघात निवड झालेला रोहित शर्मा हा भारतीय संघाचा फलंदाज नसून जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. अशा वेळी रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळणार आहे या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटले.
15 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी जम्मू आणि काश्मीर संघाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोलंदाज रोहित शर्मा यांचं नाव होते. नावाच्या साधर्म्यामुळे हा गोंधळ झाला.
जम्मू आणि काश्मीरचा हा गोलंदाज रोहित शर्मा 30 वर्षांचा आहे. त्याने 2015 मध्ये जम्मू काश्मीरसाठी पदार्पण केले. तो आता संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या संघात आकिब नबी, उमर नझीर आणि उमरान मलिकसारख्या गोलंदाजांसोबत तो खेळतो.
मागच्या हंगामात जम्मू आणि काश्मीरने मुंबईविरुद्ध छाप घातली होती. यावर्षीही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त वनडे क्रिकेट खेळतील. वर्ल्ड कपपूर्वी भारताकडे फारसे सामने नाहीत. त्यामुळे त्यांना फॉर्म राखायचा असेल तर विजय हजारे ट्रॉफी खेळणे गरजेचे ठरेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका आहे. या मालिका रोहित शर्मा यांच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.