BMC CTC भरती 2026: मुंबईत 7 पदांसाठी संधी; अर्ज प्रक्रिया सुरू

आदित्य कदम
2 Min Read

मुंबईत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. BMC CTC Recruitment 2026 अंतर्गत विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

लो.टी.म.स. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव यांच्या अंतर्गत बोरिवली (पूर्व) येथे असलेल्या केंद्रात ही भरती होणार आहे. या भरतीत एकूण 7 जागा उपलब्ध आहेत.

अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून 4 मे 2026 पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीत विकृतीशास्त्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, माहिती तंत्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, संपर्क अधिकारी आणि परिचारिका अशा पदांचा समावेश आहे.

वेतनमान पदानुसार वेगवेगळं आहे. विकृतीशास्त्रज्ञ पदासाठी दरमहा 1,12,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे. इतर पदांसाठी 20,000 ते 65,000 रुपयांपर्यंत पगार आहे.

वयोमर्यादा देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे. विकृतीशास्त्रज्ञ पदासाठी कमाल वय 50 वर्षे आहे, तर इतर पदांसाठी 38 वर्षांपर्यंतची मर्यादा आहे.

अर्ज करताना उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज शुल्क 870 रुपये आणि त्यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. शुल्क भरल्याची पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी असून, फक्त कामकाजाच्या दिवशीच अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता बोरिवली (पूर्व), मुंबई येथील MCGM – Comprehensive Thalassemia Care, Paediatric Haematology-Oncology & BMT Centre असा आहे.

शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2026 आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *