मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत असेल.
Central Railway कडून ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम सुरू आहे. यासाठीच हा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जात आहे.
या ब्लॉकमुळे मुलुंड-ठाणे आणि दिवा-डोंबिवली दरम्यान धीम्या मार्गावर परिणाम होणार आहे. अनेक धीम्या लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन लोकल सीएसएमटी-खोपोली ही रात्री 10:28 वाजता सुटेल. तर अप दिशेतील शेवटची कसारा-सीएसएमटी लोकल कल्याणहून रात्री 11:15 वाजता धावेल.
ब्लॉकदरम्यान काही जलद लोकल गाड्यांना दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे अतिरिक्त थांबे देण्यात येतील. तरीही सर्व गाड्या सरासरी 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
याशिवाय रविवारी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. काही सेवा रद्द राहतील, तर काही मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जातील.
तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.