शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी; ‘राजा शिवाजी’ व्हावा टॅक्स फ्री

आदित्य कदम
2 Min Read

1 मे रोजी प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असतानाच आता या चित्रपटाबाबत एक मोठी राजकीय मागणी समोर आली आहे.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ‘राजा शिवाजी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला आहे. हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून इतिहासाची ओळख करून देणारा आणि प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपटात महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, लोकाभिमुख प्रशासन आणि युद्धनीतीचे प्रभावी चित्रण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सिनेमा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आजच्या तरुणांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी, देशभक्तीची भावना वाढावी आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी अशा चित्रपटांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जर हा चित्रपट करमुक्त झाला, तर विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना कमी खर्चात तो पाहता येईल. त्यामुळे चित्रपटाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या या मागणीची राजकीय आणि सामाजिक स्तरावर जोरदार चर्चा सुरू झाली असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *