“मी आधीच सांगितलं होतं…” राखी सावंतचा दावा; तन्वीच्या विजयावर मोठं विधान

आदित्य कदम
2 Min Read

‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला आणि तन्वी कोलते विजेती ठरली. संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत असलेल्या तन्वीने अखेर ट्रॉफी जिंकत आपली छाप पाडली. तर राकेश बापट उपविजेता ठरला.

तन्वीच्या विजयानंतर आता वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत हिचं एक विधान जोरदार चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी तन्वी आणि तिच्या आईसोबत दिसते. त्यावेळी ती म्हणते, “पहिल्या दिवसापासून मी सांगत होते की तन्वी जिंकणार. कारण माझ्या जिभेवर तीळ आहे.” तिच्या या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

यावर तन्वीनेही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, राखीचं मन खूप मोठं आहे. तिने आधीच सांगितलं होतं आणि आता 100 दिवसांनंतर तिच्या हातात ट्रॉफी आहे. त्यामुळे हा क्षण तिच्यासाठी खास असल्याचं तिने सांगितलं.

राखीने पुढे बोलताना सलमान खान याच्याकडेही मागणी केली. ती म्हणाली, “तन्वीला हिंदी बिग बॉसमध्ये संधी द्यायला हवी.” यानंतर ती हसत म्हणाली की, “मी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन येईन आणि तिची वाट लावेन.”

हे ऐकून तन्वीने राखीला मिठी मारली. दोघींमधील हा क्षण चाहत्यांना आवडला आहे.

दरम्यान, याआधीही ‘बिग बॉस मराठी’मधील काही स्पर्धक हिंदी ‘बिग बॉस’मध्ये दिसले आहेत. यामध्ये मेघा धाडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश आहे. शिव ठाकरे हिंदी बिग बॉस 16 मध्ये उपविजेता ठरला होता.

आता तन्वी कोलतेही पुढील हिंदी बिग बॉसमध्ये दिसणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिच्या पुढील प्रवासाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *