PM Kisan Yojana : 23व्या हप्त्यापूर्वी E-KYC अनिवार्य, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आदित्य कदम
2 Min Read

PM Kisan E-KYC Deadline: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे 2,000 रुपये मिळवायचे आहेत, त्यांनी 30 जून 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारने ई-केवायसीसाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. आतापर्यंत ज्यांनी प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर ई-केवायसी न झाल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

PM Kisan E-KYC पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच ‘पीएम किसान’ मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन करूनही ई-केवायसी करता येते.

वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. अशा शेतकऱ्यांना गावस्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मदत करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करून देणार आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी 2019 ते मार्च 2026 या कालावधीत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्ते जमा करण्यात आले आहेत. 22वा हप्ता 13 मार्च रोजी वितरित करण्यात आला होता.

आता शेतकऱ्यांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे. साधारणपणे दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचे अंतर ठेवले जाते. त्यामुळे पुढील हप्ता जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

पेरणीचा हंगाम सुरू होत असल्याने अनेक शेतकरी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता PM Kisan Yojana अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *