मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने मुंबईत स्वतःचं आलिशान घर खरेदी केलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिने या नव्या घरात प्रवेश केला.
मीराने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. घराचा ताबा घेतल्यानंतर तिने पूजा करून नव्या घरात प्रवेश केल्याचं दिसत आहे.
या घराचं एक मोठं आकर्षण म्हणजे इमारतीतील Infinity स्विमिंग पूल. याशिवाय घरातून सी-लिंकचा सुंदर व्ह्यूही दिसतो, ज्यामुळे या घराची खासियत आणखी वाढते.
आपल्या पोस्टमध्ये मीराने भावना व्यक्त करत सांगितलं की, मुंबईत स्वतःचं घर असावं हे तिचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. आता ते पूर्ण झाल्याने ती खूप आनंदी आहे.
ती पुढे म्हणाली की, या घरासाठी तिने खूप मेहनत घेतली. चित्रपट, मालिकांबरोबरच मॉडेलिंग, साड्यांचा व्यवसाय आणि इतर कामांमधून तिने हे स्वप्न पूर्ण केलं. तिच्या मते, मुंबईत राहणं सोपं नाही, पण मेहनतीने सगळं शक्य होतं.
मीरा सांगते की, आयुष्यातील अनेक चढउतारांनंतर हा क्षण तिच्यासाठी खास आहे. नव्या घरात प्रवेश करताना तिला मॅनिफेस्टेशनचा अनुभव आला, असंही तिने नमूद केलं.
तिने पुढे लिहिलं की, ज्या शहराने तिला ओळख दिली, त्या मुंबईत स्वतःचं घर असणं ही मोठी गोष्ट आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या सगळ्यांचे तिने आभार मानले.
मीराने घराच्या किल्लीसह फोटो शेअर करत ‘Evil Eye’ इमोजीही वापरला आहे. तिच्या या पोस्टनंतर मराठी कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मीरा ‘ठरलं तर मग’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये दिसली आहे. तसेच ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभागी झाली होती.Q
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.