राज्य सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत यंदा मिळणार नाही मोफत साडी

आदित्य कदम
2 Min Read

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वस्त्रोद्योग विभागाने मोफत साडी वाटप योजना बंद करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यातील सुमारे 25 लाख कुटुंबांतील महिलांना शासनाकडून मोफत साडी मिळणार नाही.

यापूर्वी ई-केवायसी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्याने महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांसाठी दरवर्षी एक मोफत साडी देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना Captive Market Scheme अंतर्गत राबवली जात होती.

मात्र, आर्थिक अडचणींमुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. 2023, 2024 आणि 2025 या सलग तीन वर्षांत या योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यात आला होता.

योजना बंद झाल्यामुळे यंदाच्या दिवाळीत गरीब आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना शासनाकडून मिळणारी मोफत साडी मिळणार नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मात्र सुरूच राहणार आहे. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता 15 जुलैपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *