LPG Cylinder Loan: आता गॅस सिलिंडरसाठी ₹600 पर्यंत कर्ज! व्याज नाही, ₹100 च्या हप्त्यात परतफेड

आदित्य कदम
2 Min Read

Bharatgas LPG Micro Loan: घरात LPG सिलिंडर अचानक संपला आणि त्याच वेळी रिफिलसाठी पुरेसे पैसे नसतील, तर ग्राहकांसाठी भारतगॅसची एक खास सुविधा उपयोगी ठरू शकते. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) Buy Now, Pay Later सुविधेअंतर्गत LPG रिफिलसाठी ₹600 पर्यंतचं मायक्रो-लोन घेता येऊ शकतं.

या सुविधेची माहिती भारतगॅसने आपल्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या मायक्रो-लोनवर व्याज आकारलं जात नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

₹600 पर्यंत कर्ज, व्याज शून्य

या सुविधेअंतर्गत LPG रिफिलसाठी ₹600 पर्यंत मायक्रो-लोन उपलब्ध होऊ शकतं. घेतलेली रक्कम एकाच वेळी परत करण्याऐवजी ₹100 च्या 6 साप्ताहिक हप्त्यांमध्ये परत करता येते. त्यामुळे सिलिंडर घेताना संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरण्याचा ताण कमी होऊ शकतो.

ही सुविधा BNPL म्हणजेच Buy Now, Pay Later या पद्धतीवर आधारित आहे. BPCL ने यापूर्वीही LPG ग्राहकांसाठी BNPL सुविधेचा पायलट सुरू केल्याचं आपल्या अहवालात नमूद केलं होतं. 2025-26 मध्ये ही सुविधा 8 राज्यांमध्ये विस्तारण्यात आल्याचं BPCLच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

सुविधा कोणासाठी उपयोगी?

अचानक सिलिंडर संपला आणि त्यावेळी पूर्ण रक्कम उपलब्ध नसल्यास ही सुविधा उपयोगी ठरू शकते. विशेषतः रिफिलसाठी एकरकमी पैसे देणं कठीण असलेल्या ग्राहकांना हप्त्यांमध्ये रक्कम परत करण्याचा पर्याय मिळतो.

मात्र, ही सुविधा प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक वितरकाकडे उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे लाभ घेण्यापूर्वी संबंधित भारतगॅस वितरकाकडे उपलब्धता आणि पात्रतेची माहिती घेणं आवश्यक आहे.

भारतगॅसच्या मायक्रो-लोनचा लाभ कसा घ्यायचा?

जर तुम्हाला LPG रिफिलची गरज असेल आणि त्यासाठी लागणारी रक्कम एकाच वेळी भरणं शक्य नसेल, तर तुमच्या भारतगॅस वितरकाशी संपर्क साधा.

वितरकाकडून या मायक्रो-लोनची उपलब्धता, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया याबाबत माहिती घेता येईल. पात्रता पूर्ण झाल्यानंतर BNPL सुविधेअंतर्गत रिफिल घेता येऊ शकतो आणि कर्जाची रक्कम ठरलेल्या हप्त्यांमध्ये परत करावी लागेल.

BPCLच्या अधिकृत माहितीनुसार, Buy Now Pay Later सुविधा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या LPG परवडण्याच्या अडचणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती.

त्यामुळे सिलिंडर घेण्यासाठी ऐनवेळी पैसे कमी पडल्यास भारतगॅसची ही सुविधा पर्याय ठरू शकते. मात्र ₹600 कर्जाची उपलब्धता, पात्रता आणि परतफेडीच्या अटी तुमच्या वितरकाकडून आधी निश्चित करून घेणं महत्त्वाचं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *