Ladki Bahin Yojana: ऑगस्टचा हप्ता मिळणार! राज्य सरकारने ₹339.14 कोटींचा निधी केला वितरित

आदित्य कदम
2 Min Read

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ऑगस्ट 2026 महिन्याचा नियमित आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य सरकारने ₹339.14 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांसाठी पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते.

राज्य सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी एकूण ₹3000 कोटींचा नियतव्यय मंजूर केला आहे. त्यातील ऑगस्ट 2026 महिन्याचा लाभ देण्यासाठी ₹339.14 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, हा निधी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांकडे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

GRमध्ये नमूद केल्यानुसार, ऑगस्ट 2026 महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना देण्यासाठी ₹339.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पात्र लाभार्थींना हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता पुढे जाणार आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांची नोंदणी आणि पात्रतेची छाननी करून केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे, याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागावर सोपवण्यात आली आहे.

शासन निर्णयात निधीचा वापर करताना काटकसरीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. उपलब्ध करून दिलेला निधी मंजूर आराखड्यानुसार याच आर्थिक वर्षात खर्च करण्याची दक्षता घेण्यास सांगण्यात आलं आहे.

तसेच या निधीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आणि साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती संबंधित विभागांना नियमितपणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे ऑगस्ट 2026 च्या ₹1500 हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. आता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता कधी जमा होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *