Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत मोठे अपडेट, सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल

आदित्य कदम
2 Min Read

राज्यातील लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच १,५०० रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाकडे ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. हा निधी मे महिन्याच्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

दरम्यान, ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर राज्यभरातील सुमारे ८० लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे अनेक महिलांमध्ये मे महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये १२ ते १५ जूनदरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अधिकृत माहितीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सरकारी निर्णयानुसार १० जून रोजी मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. हा निधी योजनेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीतून देण्यात येणार आहे. पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने २०२४ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत निधी मंजूर झाल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष रक्कम खात्यात जमा होण्याकडे लागले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *