PM Kisan Yojana अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. नुकताच 23 वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता 24 व्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेतील वार्षिक आर्थिक मदत 6 हजार रुपयांवरून 9 हजार रुपये करण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे पुढील हप्त्यात शेतकऱ्यांना 3 हजार रुपये मिळू शकतात, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती.
मात्र, या चर्चांवर आता केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
कृषिमंत्र्यांनी सांगितलं की, पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.
यामुळे 24 व्या हप्त्यातही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नेहमीप्रमाणे 2 हजार रुपयेच जमा केले जातील, हे स्पष्ट झाले आहे. सध्या तरी हप्त्याच्या रकमेतील कोणताही बदल होणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
भविष्यात पीएम किसान योजनेच्या रकमेबाबत कोणताही निर्णय घेतल्यास किंवा वाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.